सुखबीर सिंग बादल यांना तोंडाचे जुलाब झालेत - नवज्योत सिंग सिद्धू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 13:35 IST2018-09-19T13:17:26+5:302018-09-19T13:35:56+5:30

करतारपूर कॉरिडोरच्या मुद्यावरुन अकाली दल आणि भाजपाकडून नवज्योत सिंग सिद्धू यांना टार्गेट केले जात आहे.

navjot singh sidhu attack on sukhbir singh badal on kartarpur corridor | सुखबीर सिंग बादल यांना तोंडाचे जुलाब झालेत - नवज्योत सिंग सिद्धू

सुखबीर सिंग बादल यांना तोंडाचे जुलाब झालेत - नवज्योत सिंग सिद्धू

नवी दिल्ली - करतारपूर कॉरिडोरच्या मुद्यावरुन अकाली दल आणि भाजपाकडून नवज्योतसिंग सिद्धू यांना टार्गेट केले जात आहे. नवज्योतसिंग सिद्धू वेडे झाले असून त्यांचा आयएसआय आणि पाकिस्तानसोबत घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप करत पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी जोरदार टीका केली होती. शिवाय, सिद्धूंच्या कॉलच्या तपशिलाचीही चौकशी करावी, अशी मागणीही सुखबीर सिंग बादल यांनी केली होती. 



दरम्यान, सुखबीर सिंग बादल यांनी केलेल्या आरोपांवर नवज्योतसिंग सिद्धू यांनी पलटवार केला आहे. सुखबीर सिंग बादल यांच्यावर निशाणा साधताना सिद्धू म्हणालेत की,  सुखबीर सिंग बादल यांना तोंडाचे जुलाब झाले असतील,तर यात माझी काही चूक नाही. जर त्यांना विचारधारेची बद्धकोष्ठता झाली असेल तर त्यात माझी काहीही चूक नाही, अशी बोचऱ्या शब्दांत सिद्धू यांनी टीका केली आहे. 


दरम्यान, यापूर्वी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनीही सिद्धूंवर निशाणा साधला होता. ''नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे एजंट असून इमरान खान त्यांचा बोलक्या बाहुल्याप्रमाणे वापर करत आहेत'',अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धू यांनी उपस्थिती दर्शवल्याबाबत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल  यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. 

सिद्धू यांच्या रुपात पाकिस्तानला नवीन एजंट मिळाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान त्यांचा बोलक्या बाहुल्याप्रमाणे वापर करुन घेत आहेत आणि सिद्धू त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत, अशी बोचरी टीका हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. 
पाकिस्तानला जाऊन त्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या. आता राहुल गांधी सिद्धूवर कारवाई करणार का?, असा प्रश्नही हरसिमरत कौर यांनी विचारला होता.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी करतारपूर मार्ग खुला करण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पहिले पाऊल उचलावे आणि पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका केली. 

Web Title: navjot singh sidhu attack on sukhbir singh badal on kartarpur corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.