शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नवज्योतसिंग सिद्धूंचा चरणजीत सिंग चन्नींवर हल्लाबोल, काँग्रेसच्या पराभवाचं कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 11:02 IST

Navjot Singh Sidhu : नवज्योतसिंग सिद्धू यांनी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगत, राज्यात पसरलेल्या माफिया राजासाठी चरणजित सिंग चन्नी यांना जबाबदार धरले.

पंजाबमधीलकाँग्रेस नेत्यांचा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यावर निशाणा साधला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगत, राज्यात पसरलेल्या माफिया राजासाठी चरणजित सिंग चन्नी यांना जबाबदार धरले.

नवज्योतसिंग सिद्धू यांनीही काँग्रेसच्या पुनरागमनाचा मार्ग सांगितला आहे. सिद्धू म्हणाले, "काँग्रेसला नूतनीकरण करावे लागेल. पाच वर्षांच्या माफिया राजामुळे काँग्रेसचा पराभव झाला. मी या माफिया राजविरुद्ध लढत राहिलो. हा लढा व्यवस्थेविरुद्ध होता. काही लोकांचा उद्योग होता, जो राज्याला दीमक सारखा खात होता. यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही सहभाग होता."

नवज्योत सिंग सिद्धू यांनी चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. अवैध वाळू उत्खननाचे प्रकरण समोर आल्यापासून नवज्योत सिंग सिद्धू हे चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणजीत सिंग चन्नी या दोघांनाही दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावरही हल्लाबोलचरणजीत सिंग चन्नी व्यतिरिक्त नवज्योतसिंग सिद्धू यांनी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावरही माफिया राजला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामुळेच गेल्या वर्षी काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले आणि चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान नवज्योतसिंग सिद्धू हे देखील काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सहभागी झाले होते. पण काँग्रेस पक्षाने नवज्योतसिंग सिद्धू ऐवजी पक्षाचा दलित चेहरा चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव पुढे केले होते.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाबcongressकाँग्रेस