शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Punjab Election : जवळचे मित्र ते राजकीय शत्रू... विक्रमसिंग मजीठिया व नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात चुरशीची लढत; अमृतसर पूर्व जागेचे काय आहे समीकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 14:51 IST

Punjab Election : निवडणुकीतील काही जागा अशा आहेत, तिथे कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. अशीच एक जागा म्हणजे अमृतसर पूर्व. या जागेवर काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी कॅबिनेट मंत्री विक्रमसिंग मजीठिया आमनेसामने आहेत.

चंदिगड : पंजाबमधील यंदाची विधानसभा निवडणूक खूपच चर्चेत असणार आहे. काँग्रेस अंतर्गत वादासह निडणुकीच्या मैदानात उतरली आहे. तर भाजपासोबत असलेल्या अकाली दलाने बसपासोबत हातमिळवणी केली आहे. याशिवाय, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला असून ते भाजपा आघाडीत निवडणूक लढवत आहेत. आम आदमी पार्टी एकटीच निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान, या निवडणुकीतील काही जागा अशा आहेत, तिथे कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. अशीच एक जागा म्हणजे अमृतसर पूर्व. या जागेवर काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी कॅबिनेट मंत्री विक्रमसिंग मजीठिया आमनेसामने आहेत.

अकाली दलाने पार्टीचे ज्येष्ठ नेते विक्रमसिंग मजीठिया यांना काँग्रेसच्या पंजाब युनिटचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात अमृतसर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विक्रमसिंग मजीठिया आणि नवज्योतसिंग सिद्धू हे एकेकाळी जवळचे मित्र होते. आज ते राजकीय शत्रू आहेत. या जागेवर दोघांमध्ये 'करो या मरो' अशी लढत होणार आहे.

विक्रमसिंग मजीठिया आणि नवज्योतसिंग सिद्धू  यांच्यात अनेकवेळा जोरदार राजकीय वाद झाले आहेत. विक्रमसिंग मजीठिया यांनी दावा केला आहे की, अमृतसर पूर्व मतदारसंघातून नवज्योतसिंग सिद्धू यांचे डिपॉझिट जप्त केले जाईल. दुसरीकडे नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी  'आधी जामीन घ्या, मग डिपॉझिट जप्त करा' असे प्रत्त्युत्तर देत विक्रमसिंग मजीठिया यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवज्योतसिंग सिद्धू बनले होते गेम चेंजर2017 मध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांनी केवळ 42,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने भाजपाचे प्रतिस्पर्धी राजेश हनी यांचा पराभव केला नाही तर अमृतसर जिल्ह्यातील 11 पैकी 10 जागा जिंकून पक्षासाठी एक गेम चेंजरची भूमिका निभावली होती. अमृतसर हा एकेकाळी अकाली दल आणि भाजपा युतीचा बालेकिल्ला होता.

मजीठिया मतदारसंघ विक्रमसिंग मजीठिया यांच्या बालेकिल्ला  हिमाचल प्रदेशातील सनावर येथील लॉरेन्स स्कूलमध्ये शिकलेल्या विक्रमसिंग मजीठिया यांनी 2017 ची निवडणूक मजिठिया मतदारसंघातून जिंकली होती. 2012 मध्ये त्यांचा विजयी फरक 47,581 होता. 2017 मध्ये ते 22,884 मतांच्या फरकाने खाली आले. 2007 मध्येही त्यांनी ही जागा जिंकली होती. त्यांचे वडील सरदार सत्यजितसिंग मजिठिया हे माजी उप संरक्षण मंत्री होते.

अमृतसर पूर्व विधानसभेची कोणी, कधी जिंकली?1951: सरूपसिंग, शिरोमणी अकाली दल1957: बलदेव प्रकाश, भारतीय जनसंघ1962: बलदेव प्रकाश, भारतीय जनसंघ1967: बलदेव प्रकाश, भारतीय जनसंघ1969: ज्ञानचंद खरबंदा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस1972: ज्ञानचंद खरबंदा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस2012: नवज्योत कौर सिद्धू, भारतीय जनता पार्टी2017: नवज्योतसिंग सिद्धू, काँग्रेस

2022 मधील अमृतसर पूर्व मतदारसंघातून उमेदवारजीवनज्योत कौर, आपनवज्योतसिंग सिद्धू, काँग्रेसविक्रमसिंग मजिठिया, अकाली दल

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस