अयोध्यानगरीला आले अतिक्रमणनगराचे स्वरूप
By Admin | Updated: March 20, 2015 23:50 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T23:50:02+5:30
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी

अयोध्यानगरीला आले अतिक्रमणनगराचे स्वरूप
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी
पंचवटी : हिरावाडीतील अयोध्यानगरी परिसरात राहणार्या काही बंगलेधारकांनी महापालिकेची पुर्व परवानगी न घेताच एकावर एक मजले चढवून तर कोणी थेट विजवितरणच्या खांबाभोवती संरक्षण कुंपण घालून अतिक्रमण केले असले तरी याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. प्रशासनातील अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याने मनपा आयुक्तांनीच या विनापरवाना वाढीव अतिक्रमणाकडे लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील शेकडो नागरीकांनी केली आहे.
हिरावाडीतील अयोध्यानगरी, त्रिकोणी बंगला, सिद्धेश्वर नगर परिसरात दिवसेंदिवस वसाहती वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी नागरीकांचे बंगले असुन अनेक नागरीकांनी चक्क आठ ते दहा फूटापर्यंत संरक्षित कुंपण घालून तर कोणी एकावर एक मजले चढवून थेट विज कंपनीच्या तारांनाही बांधकामाच्या कुवेत घेतले आहे. काहींनी तर विजवितरणच्या पोलाभोवतीच्या जागेवरही संरक्षित भिंत घालून अतिक्रमण केले आहे. महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी संपुर्ण शहरातील वाढीव अतिक्रमणावर हातोडा फिरविला मग अयोध्यानगरीतील वाढीव अतिक्रमणाकडे दुर्लक्ष कसे झाले असा सवाल नागरीकांनी केला आहे.
मनपाची पुर्व परवानगी न घेताच घरांचे नियमबाहय पक्के अतिक्रमण करून प्रशासन अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करीत नसल्याने त्यांना एकप्रकारे पाठबळच देत असल्याची नागरीकांची तक्रार आहे. अयोध्यानगरीत वाढीव बांधकामाचा सपाटा सुरू असल्याने अयोध्यानगरीला अतिक्रमणनगरीचे स्वरूप प्राप्त झाल्याची चर्चा नागरीकात सुरू आहे. (वार्ताहर)