शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

डॉक्टरांवरील हल्ल्याचे देशभर होणार सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 1:12 PM

विविध मुद्यांवर सुमारे साडेतीन लाख डॉक्टरांकडून माहिती संकलित केली जाणार

ठळक मुद्दे‘आयएमए’चा पुढाकार : साडेतीन लाख डॉक्टरांकडून घेणार माहितीदेशातील २२ राज्यांमध्ये डॉक्टरांवरील हल्लाविरोधी कायदा डॉक्टर किंवा खासगी रुग्णालये भीतीमुळे तक्रार करत नसल्याचेही निदर्शनास

राजानंद मोरे - पुणे : देशभरात डॉक्टर व रुग्णालयांवर होणाºया हल्ल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) कडून सर्वेक्षण केले जाणार आहे. हल्ला करणारे, हल्ल्याची कारणे, प्रकार, वेळ, ठिकाण, हल्ल्यामुळे झालेला शारीरिक, मानसिक त्रास, त्यासंदर्भात करण्यात आलेली तक्रार यांसह विविध मुद्यांवर सुमारे साडेतीन लाख डॉक्टरांकडून माहिती संकलित केली जाणार आहे. संकलित केलेली माहिती केंद्र सरकारला सादर केली जाणार आहे. मागील काही वर्षांपासून डॉक्टर व रुग्णालयांवरील हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शासकीय, खासगी मोठ्या रुग्णालयांसह क्लिनिकमध्येही अशा घटना घडत आहेत. हल्ल्यांप्रमाणेच मानसिक त्रास, शिवीगाळ, धमकावणे, ब्लॅकमेल करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देणे अशा विविध प्रकारे डॉक्टरांना त्रास दिला जातो. प्रामुख्याने रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होणे किंवा तो दगावल्यानंतर नातेवाईक, मित्रांकडून डॉक्टर व रुग्णालयांवर हल्ले केले जातात. २००८ ते २०१८ या कालावधीमध्ये हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटना वाढत चालल्याने देशातील २२ राज्यांमध्ये डॉक्टरांवरील हल्लाविरोधी कायदा करण्यात आला आहे. पण अनेक डॉक्टर किंवा खासगी रुग्णालये भीतीमुळे तक्रार करत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. केवळ मोजकीच प्रकरणे समोर येतात. या पार्श्वभूमीवर ‘आयएमए’ने देशभरातील डॉक्टरांवरील हल्ल्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात आयएमएचे सुमारे साडेतीन लाख सदस्य आहेत. त्या सर्वांकडून एक प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे. त्यामध्ये डॉक्टरची सर्व वैयक्तिक माहितीसह हल्ल्यासंदर्भातील सविस्तर माहितीचा समावेश आहे. डॉक्टरांविरोधात होणाºया हिंसेला जबाबदार कोण होते, हल्ल्याचे ठिकाण (क्लिनिक, वॉर्ड, आयसीयू, घर, रस्ता आदी) कोणते, कोणत्या वेळेत (सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री) घटना घडली, घटनेत दुखापत झाली का, हल्ला झाल्यानंतर काय केले, किती वेळा अशा घटनांचा सामना करावा लागला अशा विविध प्रश्नांचा समावेश प्रश्नावलीमध्ये आहे. तसेच या घटनांमुळे व्यवसायावर, वैयक्तिक पातळीवर तसेच कौटुंबिक आयुष्यात कोणते परिणाम झाले, याची माहिती घेणार आहे. अशा घटना रोखण्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत, या प्रश्नाद्वारे डॉक्टरांकडून त्यांच्या सूचनाही संकलित केल्या जाणार आहेत..............डॉक्टरांवर केवळ शारीरिक हल्लेच होत नाहीत. विविध प्रकारे मानसिक, शाब्दिक त्रास देण्याचे प्रकार घडतात. अशा अनेक घटना घडत असल्या तरी डॉक्टरांकडून तक्रारी केल्या जात नसल्याने त्या समोर येत नाहीत. डॉक्टरांकडून प्रश्नावली भरून घेतल्यानंतर घटनांचे प्रमाण, वेळ, कारणे, ठिकाणे याची माहिती एकत्रित केली जाईल. त्यातून हल्ल्यांसंदर्भातील देशातील वास्तव पुढे येईल. आयएमएच्या सुमारे साडेतीन लाख सदस्यांकडून माहिती संकलित केली जाणार आहे.- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट.

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल