शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

राष्ट्रवादी करणार एनडीएत प्रवेश, शरद पवारांना मिळणार कॅबिनेट मंत्रीपद ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 5:19 PM

नितीश कुमार यांचा जेडीयू आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीए सरकारमध्ये सहभागी होतील अशी चर्चा असून या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळात फेरबदल केले जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली, दि. 28 - केंद्रीय मंत्रिमंडळात येत्या आठवड्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.  नितीश कुमार यांचा जेडीयू आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीए सरकारमध्ये सहभागी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळात फेरबदल केले जात असल्याची माहिती मिळत आहे. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, पाच राज्यमंत्र्यांना बढती मिळणार आहे. सोबतच जेडीयू आणि राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळू शकते असा दावा टाईम्स नाऊने केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण शरद पवारांचा हात पकडून राजकारणात आल्याचं वक्तव्य याआधी केलेलं होतं. 

सुप्रिया सुळेंकडून खंडन -एकीकडे राष्ट्रवादी एनडीएत सहभागी होत असल्याची माहिती मिळत असताना खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र ही अफवा असल्याचं सांगत वृत्ताचं खंडन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत, यात कोणतंही तथ्य नाही, असं सुप्रिया सुळे एबीपी न्यूजशी बोलल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, पण या अफवा कोण पसरवतं, हे उद्योग नेमकं कोण करतं, हे कळत नसल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही ही अफवा असल्याचे सांगणारे ट्विट केले आहे.

नितीश कुमार यांना भाजपासोबत आल्याचं बक्षीस दिलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला असल्याने त्यांच्याजागी दुस-या कोणाला संधी दिली जाऊ शकते का हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. 

सुरेश प्रभूंनी सादर केला राजीनामा आणि चर्चेला आले उधाणचार दिवसांत झालेल्या दोन रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देऊ केला. मात्र, त्यांनी राजीनामा स्वीकारला नसून, प्रभू यांना ‘थांबा’ असा सल्ला दिला आहे.

उत्तर प्रदेशात १९ ऑगस्ट रोजी उत्कल एक्स्प्रेस रुळांवरून घसरून २३ जण ठार व ४00 लोक जखमी झाले. त्यानंतर, बुधवारी पुन्हा उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातात ७0 हून अधिक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी राजीनामा दिला.

त्यानंतर, काही तासांनी सुरेश प्रभू यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांनीही राजीनामाही सादर केला. मात्र, तो न स्वीकारता मोदी यांनी त्यांना थांबण्यास सांगितले आहे. स्वत: सुरेश प्रभू यांनीच टिष्ट्वटरवरून ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'या अपघातांमुळे आपण अतिशय दु:खी आहोत. जखमी झालेल्यांचे, तसेच मृतांच्या नातेवाईकांचे दु:ख पाहून मला त्रास झाला आहे. अपघात टळावेत व जनतेला चांगली रेल्वेसेवा मिळावी, यासाठी मी घाम गाळला व रक्त आटवले. रेल्वेत सुधारणेसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पावले टाकली. मात्र, अपघातांची जबाबदारी स्वकारून मी राजीनामा सादर केला आहे.'

या घटनेनंतर मंत्रिमंडळाच्या फेररचनेच्या चर्चेला उधाण आलं असून टाइम्स नाऊच्या दाव्यानुसार शरद पवारांची राष्ट्रवादी रालोआमध्ये सामील होऊ शकते आणि पवारांना मंत्रीपद मिळू शकते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी