राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:10+5:302014-12-25T22:41:10+5:30

आगीत तीन भावंडे जळून खाक

National importance- inner page | राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान

राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान

ीत तीन भावंडे जळून खाक
एजल-घरात लागलेल्या आगीत सापडलेल्या चार अल्पवयीन भावंडांपैकी तिघे जळून खाक झाल्याची घटना वैरेंगते येथे घडली. या दुर्घटनेतील एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. या घटनेच्या वेळी त्यांचे आईवडील घरात नव्हते. घरात असलेल्या मेणबत्तीमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
------------------------------------

महिला डॉक्टरवर ॲसिड हल्लाप्रकरणी दोघे अटकेत
नवी दिल्ली-राजौरी गार्डन भागात मंगळवारी एका महिला डॉक्टरवर झालेल्या ॲसिड हल्लाप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोघांना ताब्यात घेतले. यापैकी एकजण अल्पवयीन असून त्यांची चौकशी सुरू आहे. या हल्ल्यात आणखी दोघेजण सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मोटरसायकलवरून आलेल्या या हल्लेखोरांनी या महिला डॉक्टरवर ॲसिड फेकून त्यांची बॅग घेऊन पळ काढला होता.
------------------------------------------------------

महिलेने तीन महिन्यांच्या मुलीला विकले
हैदराबाद-येथील चिलकलगुडा भागात दोन जोडप्यांना एका तीन महिन्याच्या मुलीला विकल्याच्या आरोपात अटक करण्यात आली. या मुलीच्या आईने कथित रूपाने तिला १५ हजारात भवानी नावाच्या एका महिलेला विकल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या दोन्ही जोडप्यांना अटक केली आहे. या बालिकेला बालमुक्ती केंद्रात पाठविले आहे.
-------------------------------------------------

केरळात ५८ जणांचा हिंदू धर्मात प्रवेश
कोट्टायम-नाताळच्या दिवशी येथे ५८ नागरिकांनी दोन मंदिरात विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. यातील बहुतेक नागरिक ख्रिश्चन होते. विहिपचे जिल्हा अध्यक्ष बालचंद्रन पिल्ले यांनी पोनकुन्नम येथील पुथियाकावू देवी मंदिरात व श्रीकृष्ण स्वामी मंदिरात या नागरिकांनी हिंदू धर्म स्वीकारल्याचे सांगितले. यात एक मुस्लीम व्यक्तीही असल्याचे ते पुढे म्हणाले.
----------------------------------------

विद्यार्थिनीवर ॲसिड हल्लाप्रकरणी दोघे अटकेत
श्रीनगर-कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर केलेल्या ॲसिड हल्लाप्रकरणी दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ११ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. यातील एक तरुण बेमिना भागातील तर दुसरा लालमंडीचा आहे. या घटनेची समाजाच्या सर्व स्तरातून निंदा करण्यात आली होती.
--------------------------------------

ताजमहाल व हूमायूंच्या मकबरेचे आता ऑनलाईन प्रवेश तिकिट
नवी दिल्ली-आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लवकरच ताजमहाल व हूमायूंच्या मकबरेच्या प्रवेशाचे तिकिट उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचसोबत पर्यटन मंत्रालय व आयआरसीटीसी मिळून एक ई तिकिट योजना सुरू करत आहेत. या योजनेची सुरुवात ताजमहाल व हूमायूंच्या मकबऱ्यापासून करून ती अन्य स्मारकांसाठीही लागू केली जाईल. या योजनेमुळे नागरिकांना आता तिकिटाच्या रांगेत उभे रहावे लागणार नाही.
-----------------------------------------
बाल सुधारगृहातून दहा मुलांचे पलायन
चेन्नई- येथील एका सरकारी बालसुधार गृहातून दहा किशोरवयीन मुलांनी पळ काढल्याची घटना घडली. सुधारगृहाच्या अधीक्षकांनी कथित रूपाने केलेल्या मारहाणीमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. या मुलांचे वय १६ ते १८ दरम्यान आहे. या मुलांचा शोध सुरू आहे.

Web Title: National importance- inner page

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.