ED कारवाईविरोधात निदर्शने करणाऱ्या CM गहलोत-बघेलसह अनेक दिग्गज नेते पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 02:45 PM2022-06-13T14:45:28+5:302022-06-13T14:45:37+5:30

National Herald Case: राहुल गांधींच्या ED चौकशीचा विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर प्रियंका गांधी यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या नेत्यांची भेट घेतली.

National Herald Case: Rahul Gandhi ED inquiry on National Herald case, Congress leaders detained by delhi police | ED कारवाईविरोधात निदर्शने करणाऱ्या CM गहलोत-बघेलसह अनेक दिग्गज नेते पोलिसांच्या ताब्यात

ED कारवाईविरोधात निदर्शने करणाऱ्या CM गहलोत-बघेलसह अनेक दिग्गज नेते पोलिसांच्या ताब्यात

Next

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी राहुल गांधींची चौकशी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीचे अधिकारी त्यांना 50 हून अधिक प्रश्न विचारत आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून या कारवाईला कडाडून विरोध होत आहे. आज सकाळपासूनच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत ठिकठिकाणी राहुल यांचे पोस्टर लावले. 'हे राहुल गांधी आहेत, झुकणार नाहीत,' असा संदेश त्यावरुन देण्यात येतोय. देशाच्या इतर भागातही पक्षाचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत.

राहुल ईडी कार्यालयात दाखल झाल्यानंतर, कार्यालयाबाहेर काँग्रेसचे दिग्गज नेते निदर्शने करत आहेत. यादरम्यान, दिल्ली पोलिसांनी मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंग, दीपेंद्र हुडा, पवन खेरा, पीएल पुनिया, गौरव गोगोई, मीनाक्षी नटराजन यांच्यासह काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना ताब्यात घेतले. मध्य दिल्लीतून बसमध्ये बसवून या नेत्यांना घेऊन गेले. तिकडे, काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी तुघलक रोड पोलिस स्टेशनच्या एसएचओला पत्र देऊन पोलिस कर्मचाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे.

अटकेतील नेत्यांना भेटण्यासाठी प्रियंका पोहोचल्या
राहुल गांधींसोबत ईडी कार्यालयात जाणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांचा समावेश आहे. प्रियांका गांधी यांनी तुघलक रोड पोलीस ठाणे गाठल्यानंतर या नेत्यांची भेट घेतली.

काँग्रेस मुख्यालय ते ईडी कार्यालयापर्यंतचा रस्ता सील
काँग्रेसची निदर्शने पाहता दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालय ते ईडी कार्यालयापर्यंतचा रस्ता सील केला होता. ईडी कार्यालयाजवळ तीन थरांची सुरक्षा व्यवस्था आहे. काँग्रेसचा मोर्चा पहिल्या सर्कलजवळ पोलिसांनी रोखला होता. येथे कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. याआधी सोमवारी सकाळी राहुल गांधींच्या तपासाविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयातून ताब्यात घेतले होते.

राहुलसाठी ईडीची प्रश्नांची लांबलचक यादी तयार
राहुल गांधींना चौकशीसाठी ईडीने प्रश्नांची एक लांबलचक यादी तयार केली आहे. सुमारे दोन डझन प्रश्न ईडीचे अधिकारी विचारतील, जे सर्व नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडिया कंपनीशी संबंधित आहेत. राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांची यंग इंडिया कंपनीत 38-38% हिस्सेदारी आहे. बाकी काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे आहे. या दोन्ही नेत्यांचे निधन झाले आहे.

Web Title: National Herald Case: Rahul Gandhi ED inquiry on National Herald case, Congress leaders detained by delhi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.