राष्ट्र पानासाठी.... महत्त्वाचे....

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:23+5:302015-02-14T23:52:23+5:30

राष्ट्र पानासाठी...महत्त्वाचे...१४फेब्रुवारी २०१५माझी यांना पाठिंबाकटीहार : पक्षाविरुद्ध भूमिका घेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू ...

National flag ... | राष्ट्र पानासाठी.... महत्त्वाचे....

राष्ट्र पानासाठी.... महत्त्वाचे....

>राष्ट्र पानासाठी...महत्त्वाचे...१४फेब्रुवारी २०१५

माझी यांना पाठिंबा
कटीहार : पक्षाविरुद्ध भूमिका घेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांनी जितन राम माझी यांना हटविण्याच्या मुद्यावर नितीश कुमार यांना पाठिंबा देऊ नये, असे आवाहन पक्षाध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना केले आहे. माझी यांना हटविण्याचे कटकारस्थान उचित नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपने चूक केली
कोलकाता : लोकसभा निवडणुकीनंतर दिल्ली विधानसभेची निवडणूक न घेऊन भाजपने चूक केली. ही चूक कबुल करण्यात मला जराही संकोच वाटत नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री एम. व्यंकय्या नायडू म्हणाले. दिल्लीतील निवडणूक जबर हादराच आहे, यात शंका नाही; परंतु, भाजपचा दिल्लीतील जनाधार मात्र कायम आहे, असेही ते म्हणाले.
१८ लाखांसह आरोपींना अटक
सिवनी : ३० जानेवारीच्या रात्री घडलेल्या लुटालुट प्रकरणातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १८ लाख रुपये, एक वाहन, पाच मोटारसायकली आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला, असे जिल्हा पोलिसांनी सांगितले.
नॅकाँकडून स्वागत
श्रीनगर : पुन्हा वाटाघाटी सुरु करण्याच्या दृष्टीने भारत आणि पाकिस्तानच्या राजनैतिक प्रयत्नांचे नॅशनल कॉन्फरन्सने स्वागत केले आहे. दोन्ही देशांदरम्यानचे वैमनस्य आणि कोंडी संपुष्टात आणणे जरुरी आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे सरचिटणीस अली मोहम्मद सागर यांनी म्हटले आहे.

Web Title: National flag ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.