CoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 06:04 PM2021-05-17T18:04:10+5:302021-05-17T18:09:45+5:30

CoronaVirus News : कोरोना लसीकरणाचे दुष्परिणाम तपासण्यासाठी AEFI समिती (एडवर्स इवेंट्स फॉलोइंग इम्युनाइजेशन) तयार करण्यात आली होती.

National AEFI Committee says, bleeding and clotting cases following COVID vaccination in India are minuscule | CoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट

CoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट

Next
ठळक मुद्देभारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेली लस कोवॅक्सिनमध्ये रेअर ब्लड क्लॉटिंग होण्याची कोणतीही घटना उघडकीस आली नसल्याचेही या समितीने म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणानंतर (Covid Vaccine)गंभीर दुष्परिणामांचा (Serious Side Effects) तपास करणाऱ्या तज्ज्ञांनी ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूप कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणाचे दुष्परिणाम तपासण्यासाठी AEFI समिती (एडवर्स इवेंट्स फॉलोइंग इम्युनाइजेशन) तयार करण्यात आली होती. या समितीमध्ये  498 गंभीर प्रकरणांचा तपास करण्यात आला आणि असे आढळले की, केवळ 26 जणांनाच दुर्मीळ रक्त गोठण्याची (रेअर ब्लड क्लॉटिंग) समस्या आहे. समितीने सोमवारी आरोग्य मंत्रालयाला यासंदर्भातील माहिती दिली आहे. (National AEFI Committee says, bleeding and clotting cases following COVID vaccination in India are minuscule)

समितीने म्हटले आहे की, कोव्हिशिल्डमध्ये (ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॉजेनेका लस) प्रति दहा लाख प्रकरणांमध्ये 0.61 टक्के रेअर ब्लड क्लॉटिंगची प्रकरणे समोर आली आहेत. भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेली लस कोवॅक्सिनमध्ये रेअर ब्लड क्लॉटिंग होण्याची कोणतीही घटना उघडकीस आली नसल्याचेही या समितीने म्हटले आहे.

ब्लड क्लॉटिंगच्या बातमीनंतर ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॉजेनेका लसीला फटका 
काही दिवसांपूर्वी युरोपियन ड्रग नियामक संस्थेने म्हटले होते की, त्यांना ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॉजेनेका लस घेतल्यानंतर रेअर ब्लड क्लॉटिंग होत असल्याची माहिती मिळाली. मात्र, या लसीपासून होणारे फायदे इतके आहेत की रेअर ब्लड क्लॉटिंगच्या घटनांकडेही दुर्लक्ष केले जाऊ शकते, असेही संख्येने असेही म्हटले आहे. युरोपियन युनियनच्या या संस्थेने या लसीवर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यास नकार दिला. मात्र, तरीही ब्लड क्लॉटिंग होत असल्याच्या बातमीमुळे किमान लसीचा एक डोस घेतलेल्या कोट्यावधी लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

मॉडेर्ना आणि Pfizerच्या लसींच्या तुलनेत अ‍ॅस्ट्रॉजेनेकाच्या लसीला जगभर पसंती दिली जात होती. मात्र, Pfizerची लस 95 टक्के एफिकेसी रेटच्या समक्ष अ‍ॅस्ट्रॉजेनेका लसीचा एफिकेसी रेट 79 टक्के आहे. ब्लड क्लॉटिंगच्या बातमीनंतर बर्‍याच युरोपियन देशांमध्ये या लसीचे लसीकरण थांबवल्याच्या बातम्या आल्या होत्या. दक्षिण कोरिया आणि फिलिपिन्सनेही अ‍ॅस्ट्रॉजेनेका लसीचे लसीकरण थांबविले आहे.

काय आहे रेअर ब्लड क्लॉटिंग?
सेलेबल वेनस सायनस थ्रोबोसिस (CVST) म्हणून ओळखले जाणारे रेअर ब्लड क्लॉटिंग पहिल्यांदा जर्मनच्या मेडिकल रेग्युलर Paul Ehrlich Institute ला आढळले.  मार्चच्या मध्यात इंस्टिट्यूटने सांगितले की, ब्लड क्लॉटिंग बहुतेक तरुण आणि मध्यमवयीन महिलांमध्ये होत असल्याचे दिसून आले. यानंतर जर्मनीने 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना ही लस वापरणे बंद केले. जर्मनीच्या निर्णयानंतर कॅनडा, स्पेन, फ्रान्स आणि इटली यांनीही अशीच पावले उचलली.
 

Web Title: National AEFI Committee says, bleeding and clotting cases following COVID vaccination in India are minuscule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.