'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:48 IST2025-08-27T19:45:34+5:302025-08-27T19:48:11+5:30

रशियाकडून तेल खरेदी केल्याप्रकरणी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५% कर लादल्याने भारत आणि अमेरिकेतील व्यापारी तणाव वाढत आहे.

Nation first, trade later India did not give up even after Donald Trump's 'tariffs Modi government gave this message | 'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश

'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात टॅरिफ वाढवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ५० टक्के कर लादला आहे. हा कर वाढवण्यामागे भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचे कारण असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी कर वाढवूनही भारताने अजूनही माघार घेतलेली नाही. भारताने रशियाकडून तेल आयात करणे सुरूच ठेवले आहे. 

'रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबणार नाही. भारत सरकार अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, असं मत भारतीय तेल कंपन्यांचं आहे. 'पहिले देश, नंतर व्यापार' असं अधिकाऱ्यांचा स्पष्ट संदेश आहे. 

पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...

सरकारकडून कोणताही आदेश मिळालेला नाही

'रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा कोणताही आदेश सरकारकडून मिळालेला नाही, असं तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात ऑर्डर निश्चितच थोड्या कमी झाल्या आहेत, परंतु याचे कारण अमेरिकन टॅरिफ नाही तर रशियाकडून मिळालेली कमी सूट आहे.

गेल्या वर्षी, रशियन कच्चे तेल प्रति बॅरल 2.5 डॉलर ते 3 डॉलरने स्वस्त उपलब्ध होते, पण आता ही सवलत फक्त 1.5 डॉलर ते 1.7 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. ऑक्टोबरपासून ऑर्डर पुन्हा वाढू शकतात, कारण रशिया पुन्हा सवलत वाढवण्याची तयारी करत आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणार नाही

"सरकारचा संदेश स्पष्ट आहे की आम्ही झुकणार नाही. जर आता तेल आयात थांबवली तर अमेरिका अधिक अटी लादेल, असं एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 'जर भारताला हवे असेल तर ते इतर देशांकडून कच्चे तेल सहजपणे खरेदी करू शकतात, असा तेल उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांचा विश्वास आहे.

पण असे करणे अमेरिकेच्या दबावापुढे झुकणे मानले जाईल. म्हणूनच, सरकार सध्या हा पर्याय टाळू इच्छित आहे. जर भारताने रशियन तेल खरेदी करणे तात्काळ थांबवले तर जागतिक तेल बाजारावर फारसा परिणाम होणार नाही.

रशिया नंतर तेल दुसऱ्या देशाला विकेल आणि भारत उर्वरित तेल खरेदी करेल. फक्त पुरवठा साखळी थोडी बदलेल. सध्या, भारतीय रिफायनरीज परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांचे एकमेव लक्ष तेलाचा पुरेसा आणि सतत पुरवठा उपलब्ध आहे याची खात्री करणे आहे. 

Web Title: Nation first, trade later India did not give up even after Donald Trump's 'tariffs Modi government gave this message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.