शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गांधींच्या गुजरातमध्ये साजरा केला नथुरामचा जन्मदिवस, पोलिसांनी सहा जणांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 13:27 IST

भाजपाच्या उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी महात्मा गांधींचा हत्यारा असलेल्या नथुरामवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून वाद निर्माण झाला होता.

अहमदाबादः भाजपाच्या उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी महात्मा गांधींचा हत्यारा असलेल्या नथुरामवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून वाद निर्माण झाला होता. तो वाद शांत होत नाही, तोच आता गुजरातमधल्या सूरतमध्ये नथुराम गोडसेचा वाढदिवस साजरा केल्याचं निदर्शनास आलं आहे. सूरतच्या लिंबायत भागात महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करण्यात आल्यानं पुन्हा एकदा हा वाद चव्हाट्यावर आला आहे. सूरतमधल्या लिंबायत भागात सूर्यमुखी हनुमान मंदिर आहे.तिथे 19 मे रोजी महात्मा गांधीजींचा हत्यारा असलेल्या नथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. मंदिराच्या आवारात अखिल भारतीय हिंदू महासभेच्या या लोकांना नथुराम गोडसेची प्रतिमा समोर ठेवून त्याचा जन्मदिवस साजरा केला आणि एकमेकांना गोडधोडही भरवलं. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा हत्यारा नथुरामचा जन्मदिवस साजरा केल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गुजरात सरकारनं यावर कारवाई केली आहे. गुजरात पोलिसांनी गोडसेचा जन्मदिवस साजरा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सूरत पोलिसांना दिले होते. सूरत पोलीस कमिश्नर सतीश शर्मा यांनी नथुरामचा जन्मदिवस साजरा करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी हिंदू महासभेचे कार्यकर्ते आहेत. विशेष म्हणजे महात्मा गांधींचा जिथे जन्म झाला आणि जिथून त्यांनी सत्याग्रह केला, त्याच गुजरातमध्ये नथुरामचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गुजरातमधले गांधीवादी लोकही नाराज झाले आहेत.   

टॅग्स :Nathuram Godseनथुराम गोडसेGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक निकाल 2019