सेट परीक्षेचे नाशिक केंद्र बदलले

By Admin | Updated: August 7, 2015 01:14 IST2015-08-07T00:06:53+5:302015-08-07T01:14:09+5:30

सिंहस्थ पर्वणी : विद्यार्थ्यांना करावी लागेल संगमनेरवारी

Nashik center changed the set test | सेट परीक्षेचे नाशिक केंद्र बदलले

सेट परीक्षेचे नाशिक केंद्र बदलले

सिंहस्थ पर्वणी : विद्यार्थ्यांना करावी लागेल संगमनेरवारी
नाशिक : २९ ऑगस्टच्या पर्वणीनंतर दुसर्‍याच दिवशी येणार्‍या रविवारी सेट परीक्षा असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक केंद्रावर होणारी परीक्षा संगमनेर येथे होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
२९ ऑगस्टची नाशिकची कुंभपर्वणी संपण्यापाठोपाठ ३० ऑगस्टला रविवारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सेट परीक्षेचे नियोजन शहरातील विविध केंद्रांवर करण्यात आले होते. मात्र लक्षावधी भाविकांचा या दिवशीचा अपेक्षित ओघ लक्षात घेऊन परीक्षा नाशिक येथे न घेता संगमनेरला घेण्याचे ठरविले आहे. परीक्षेसाठी नाशिक जिल्‘ातून साडेसात ते आठ हजार उमेदवार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक केलेल्या या बदलामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. दरम्यान, परीक्षेच्या दहा दिवस अगोदर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान आहे; परंतु पर्वणी काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेत केलेले बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांना संगमनेर गाठतानादेखील बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

Web Title: Nashik center changed the set test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.