शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मी देशभक्तच, पण गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही- नसीरुद्दीन शहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 17:19 IST

नसीरुद्दीन शहांचं जुन्या विधानबद्दल स्पष्टीकरण

नवी दिल्ली: देशातील झुंडशाही पाहून भीती वाटते असं विधान करणाऱ्या अभिनेते नसीरुद्दीन शहांवर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका केली. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेनं शहांसाठी थेट पाकिस्तानचं तिकीट काढलं. यानंतर आता शहांनी त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. मी पण देशभक्त आहे. पण मला गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही, असं शहांनी म्हटलं. शहांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचं विधान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. नसीरुद्दीन शाह यांच्या विधानानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यामुळे त्यांना अजमेर लिटरेचर फेस्टिवलमधील सहभाग घेता आला नव्हता. आता अजमेरपासून दूर असलेल्या पुष्करमध्ये बंद दरवाज्याआड एका अज्ञात स्थळी नसरुद्दीन यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उर्दू लेखक सैफ मोहम्मद यांनी केलं. यावेळी नसीर यांनी 'नसीर का नजीर फिर एक दिन' या पुस्तकाचं प्रकाशन केलं. हा देश माझी मातृभूमी असल्याचं नसरुद्दीन शहांनी यावेळी म्हटलं. 'मे देशद्रोही नाही. देशावर टीका करताना मला दु:ख होतं. मात्र चुकीचं वाटल्यास त्यावर मी अवश्य बोलणार. मला देशाच्या भविष्याची चिंता वाटते. माझ्या 4 पिढ्या या देशात जन्मल्या. माझा जन्मदेखील याच देशात झाला. माझी मुलंदेखील इथंच राहणार आहेत. माझं देशावर खूप प्रेम आहे. मात्र त्यासाठी मला गोंधळ घालण्याची आवश्यकता वाटत नाही,' असं नसीरुद्दीन यांनी म्हटलं. 

टॅग्स :Naseeruddin Shahनसिरुद्दीन शाहcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारIndiaभारत