'नारी शक्ती'ला ऑक्सफर्डमध्ये स्थान, 'वर्ड ऑफ द ईयर' शब्दाचा बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 13:25 IST2019-01-27T13:14:12+5:302019-01-27T13:25:31+5:30

भारतामधील 'नारी शक्ती' या शब्दाला आता जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2018 मधील 'वर्ड ऑफ द ईयर' म्हणून 'नारी शक्ती' या शब्दाची घोषणा केली आहे.

nari shakti hindi word of the year 2018 oxford dictionary | 'नारी शक्ती'ला ऑक्सफर्डमध्ये स्थान, 'वर्ड ऑफ द ईयर' शब्दाचा बहुमान

'नारी शक्ती'ला ऑक्सफर्डमध्ये स्थान, 'वर्ड ऑफ द ईयर' शब्दाचा बहुमान

ठळक मुद्देभारतामधील 'नारी शक्ती' या शब्दाला आता जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली आहे.ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2018 मधील 'वर्ड ऑफ द ईयर' म्हणून 'नारी शक्ती' या शब्दाची घोषणा केली आहे. जयपूर येथे आयोजित साहित्य महोत्सवात ही घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - भारतामधील 'नारी शक्ती' या शब्दाला आता जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2018 मधील 'वर्ड ऑफ द ईयर' म्हणून 'नारी शक्ती' या शब्दाची घोषणा केली आहे. जयपूर येथे आयोजित साहित्य महोत्सवात ही घोषणा करण्यात आली आहे.

ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या मते हा शब्द संस्कृतमधून घेण्यात आला आहे. महिलांचे अधिकार आणि प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या प्रतिनिधीत्वासंदर्भात 'नारी शक्ती' या हिंदी शब्दाचा उपयोग केला जातो. त्यामुळेच बऱ्याच मंथनानंतर ‘नारी शक्ती’ या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. महिला सशक्तीकरणासाठी सरकारने केलेले प्रयत्न आणि मीटू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या शब्दाचा डिक्शनरीत समावेश करण्यात आल्याची  माहिती ऑक्सफर्डकडून देण्यात आली आहे.  याआधी ऑक्सफर्डने 2017 मध्ये ‘आधार’ या शब्दाचा डिक्शनरीत समावेश केला होता. 

Web Title: nari shakti hindi word of the year 2018 oxford dictionary

टॅग्स :Womenमहिला