नवी दिल्ली - लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर सामान्यपणे देवदेवतांची, शुभ चिन्हांची छायाचित्रे असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेली लग्न पत्रिका बरीच व्हायरल होत आहे. मोदींचे छायाचित्र असलेल्या या पत्रिकेच्या माध्यमातून एका युवकाने लग्नात अहेर आणला नाही तरी चालेल, पण पुढच्या निवडणुकीत मत मात्र मोदींनाच द्या, असा संदेश दिला आहे. लग्न पत्रिकेवर मोदींचा फोटो छापणाऱ्या तरुणाचे नाव प्रवीण कुमार असून, तो कर्नाटकमधील मंगळुरूजवळील उल्लाल येथील राहणारा आहे. तो पेशाने एसी मेकॅनिक असून, तो कुवेत येथे कामाला आहे. प्रवीण कुमार याने आपल्या विवाहाची पत्रिका मोदीमय बनवली आहे. या पत्रिकेवर त्याने मोदींच्या छायाचित्राबरोबरच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहितीही दिली आहे.
तरुणाने लग्नपत्रिकेवर छापला नरेंद्र मोदींचा फोटो, म्हणाला, अहेर आणू नका पण, मत मात्र...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 17:58 IST
लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर सामान्यपणे देवदेवतांची, शुभ चिन्हांची छायाचित्रे असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेली पत्रिका बरीच व्हायरल होत आहे.
तरुणाने लग्नपत्रिकेवर छापला नरेंद्र मोदींचा फोटो, म्हणाला, अहेर आणू नका पण, मत मात्र...
ठळक मुद्देसध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेली लग्न पत्रिका बरीच व्हायरल होत आहे. या पत्रिकेच्या माध्यमातून एका युवकाने लग्नात अहेर आणला नाही तरी चालेल, पण पुढच्या निवडणुकीत मत मात्र मोदींनाच द्या, असा संदेश दिला आहेलग्न पत्रिकेवर मोदींचा फोटो छापणाऱ्या तरुणाचे नाव प्रवीण कुमार असून, तो कर्नाटकमधील मंगळुरूजवळील उल्लाल येथील राहणारा आहे