शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींमध्ये असुरक्षिततेची भावना, खोटेपणा त्यांच्या सरकारची ओळख - अरुण शौरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 13:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मोठया प्रमाणावर असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात मोठया प्रमाणावर अधिकारांचे केंद्रीकरण झाले आहे.

ठळक मुद्देमोदी असुरक्षित असल्यामुळे पंतप्रधान कार्यालय कमकुवत आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना स्वत:चा जनाधार नाहीय.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मोठया प्रमाणावर असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात मोठया प्रमाणावर अधिकारांचे केंद्रीकरण झाले आहे. मी आजच्या इतके कुठलेही पंतप्रधान कार्यालय कमकुवत पाहिलेले नाही अशा शब्दात प्रसिद्ध पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी मोदी सरकारवर टीका केली. 

अरुण शौरी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. खोटेपणा ही मोदी सरकारची ओळख आहे. नोक-या निर्मिती आणि अन्य आघाडयांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. नवी दिल्लीत आयोजित 'टाइम्स लिट फेस्ट'मध्ये ते बोलत होते. जी व्यक्ती मानसिक दृष्टया सुरक्षित आहे ती व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत निराश होणार नाही आणि ज्या व्यक्तीमध्ये असुरक्षिततेची भावना आहे अशी व्यक्ती जो तज्ञ आहे, ज्याला एखाद्या विषयातले कळते त्याला स्वत:च्या जवळ येऊ देणार नाही. 

आज गाढव घोडे बनले आहेत आणि नेते ठरवू शकतात त्यांना कोणाबरोबर रहायच आहे असे शौरी म्हणाले. मोदी असुरक्षित असल्यामुळे पंतप्रधान कार्यालय कमकुवत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना स्वत:चा जनाधार नाहीय. त्यामुळे त्यांच्यापासून मोदींना काहीही धोका नाही असे शौरी म्हणाले. टीकेच्या बाबतीत मोदीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार अत्यंत संवेदनशील आहे असे शौरी म्हणाले. अरुण शौरी, यशवंत सिन्हा हे मोदी सरकारचे विरोधक समजले जातात. दोघांनी यापूर्वीही अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. 

मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन दोनवर्षांपूर्वी एका मुलाखतीत नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष  अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे तिघेच आज भाजपा चालवत आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली होती. या तिघांनी वेळोवळी विरोधकांचा उपमर्द तर केलाच पण स्वपक्षीयांच्या मनातही भीती निर्माण केल्याचा आरोप शौरी यांनी केला होता. योग्य ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचत नसल्याने आवश्यक तिथे बदल होत नाहीत, असे मत त्यांनी नोंदवले. तसेच मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन असल्याचेही त्यांनी म्हटले होते. सरकारचा कारभार काही बाबतीत चांगला असला तरी आर्थिक चित्र पालटण्याचे आश्वासन मात्र पाळण्यात आलेलं नाही, असही शौरी यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Arun Shourieअरुण शौरीNarendra Modiनरेंद्र मोदी