शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारविरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात; पाटण्यात 23 जून रोजी विरोधकांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 20:38 IST

राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवालांसह अनेक नेते उपस्थित राहणार.

पाटणा: केंद्रातील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटत आहेत. याच अनुषंगाने बिहारच्या पाटण्यात 12 जून रोजी होणारी विरोधकांची बैठक आता 23 जून रोजी होणार आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी बुधवारी ही माहिती दिली. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, केजरीवाल, हेमंत सोरेन, स्टॅलिन, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, डी राजा, दीपंकर भट्टाचार्य या नावांसह डावे नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

नितीश कुमार यांच्या पुढाकाराने विरोधी ऐक्यासाठी ही बैठक होत आहे. यापूर्वी 12 जून रोजी बैठक होणार होती, परंतु या दिवशी अनेक नेते बाहेर असल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकणार नव्हते. त्यामुळेच तारीख पुढे ढकलण्यात आली. पक्षांना जोडण्यासाठी नितीश कुमार सप्टेंबर 2022 पासून देशभर प्रवास करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचीही त्यांनी दिल्लीत भेट घेतली होती. या भेटींमधून ते भाजपविरोधी पक्षांना एकवटण्याचा प्रयत्न करत आहेत.

फक्त 100 जागांवर भाजपचा पराभव करायचा भाजपपासून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार सातत्याने भाजपवर टीका करताना दिसत आहेत. यातच आता भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांना एकवटण्याचे काम सुरू आहे. तसेच, लोकसभेत भाजपचा 100 जागांवर पराभव करण्याचे लक्ष त्यांनी आखले आहे. ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचे सरकार आहे, तिथे महाआघाडी स्थापन करून भाजपच्या विरोधात एकच उमेदवार उभा करणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणने आहे. यामध्ये प्रामुख्याने यूपीमधील 80, बिहारमधील 40, बंगालमधील 42, महाराष्ट्रातील 48, दिल्लीतील 7, पंजाबमधील 13 आणि झारखंडमधील 14 लोकसभेच्या जागांचा समावेश आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहार