वायनाड - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या वायनाड या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधी यांनी वायनाड येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. ''नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी खोटेपणाचा वापर केला. मोदी हे देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी द्वेषाच्या विषाचा वापर करत आहेत,'' असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. वायनाड येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आक्रमक भाषेत नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. आज राष्ट्रीय पातळीवर आम्ही विषाशी लढा देत आहोत. मी कठोर शब्द वापरतोय, असे तुम्हाला वाटत असेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी द्वेषाच्या विषाचा वापर करत आहेत. राग आणि द्वेषाचा वापर करून ते देशातील जनतेमध्ये फूट पाडत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी खोटेपणाचा आधार घेत आहेत." असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
देशामध्ये फूट पाडण्यासाठी मोदी करताहेत द्वेषाच्या विषाचा वापर, राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 13:37 IST