शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये अराजकता माजेल', विरोधकांच्या टीकेला पंतप्रधानांचे उत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 16:13 IST

पीएम मोदींच्या तिसऱ्या टर्मबाबत सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधानांनी जोरदार पलटवार केला.

Narendra Modi Hoshangabad Rally: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिशय टोकाचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, विरोधक सातत्याने, मोदी सरकारकडून देशाला धोका आहे. मोदी सरकार संविधान बदलणार, अशाप्रकारच्या टीका होतात. आता या सर्व टीकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार केला. तसेच, विरोधकांना थेट सल्लाही दिला.

मध्य प्रदेशच्या होशंगाबाद येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यावर आग लागेल, असे काँग्रेसवाले म्हणतात. 2014 आणि 2019 मध्येही ते अशाच प्रकारची टीका करायचे. पण, आतापर्यंत कधी देशात आग लागली का? राम मंदिराबाबतही ते हेच बोलायचे, पण यामुळे आग लागली का? आग देशात नाही, तर त्यांच्या मनात लागली आहे. ही ईर्षा त्यांच्या मनात इतकी तीव्र झाली आहे की, त्यांना आतून जाळत आहे. ही ईर्षा मोदींमुळे नाही, तर 140 कोटी नागरिकांच्या मोदींवरील प्रेमामुळे आहे. त्यांना हे प्रेमही सहन होत नाही, अशी टीका मोदींनी केली.

इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यावर म्हणाले...तुम्ही इंडिया आघाडीची स्थिती पाहा. जाहीरनामा एक जबाबदारी आहे, देशातील जनतेशी बांधिलकी आहे. त्यांना काय करायचे आहे, कसे करायचे? हेदेखील त्यांच्या बोलण्यात कुठेच दिसत नाही. त्यांच्या एका सहकाऱ्याने जाहीरनाम्यात म्हटले की, आम्ही देशातून अण्वस्त्रे नष्ट करू. कोणताही देश असा विचार करेल का? यावरुनच, ते देशाच्या हिताचा विचार करू शकतात का? असा प्रश्न पडतो. त्यांचा विचार जितका घातक आहे, तितकाच त्यांचा जाहीरनामाही धोकादायक आहे, असा घणाघात मोदींनी केली. 

घराणेशाहीच्या राजकारणावर निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अनेक दशके काँग्रेसच्या एकाच कुटुंबाने थेट किंवा रिमोट कंट्रोलने सरकार चालवले. या कुटुंबाने देशात आणीबाणी लागू केली. काँग्रेसने पत्त्याच्या घराप्रमाणे देशभरातील लोकशाही सरकारे पाडली. काँग्रेसने आपल्या इच्छेनुसार इतिहासाचे विकृतीकरण करुन हवे ते मिळवले. काँग्रेसचे मानायचे झाले तर, त्या काळात लोकशाही चांगली चालली होती आणि बहरत होती. मात्र गरीब कुटुंबातील मुलगा पंतप्रधान होताच काँग्रेसने संविधान आणि लोकशाही धोक्यात येईल, अशा अफवा पसरवण्यास सुरुवात केली. काँग्रेसवाल्यांना माहीत नसेल, पण बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी इथपर्यंत पोहोचले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस