शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: अखेर, नरेंद्र मोदींनी सस्पेन्स संपवला, 'सोशल संन्यासा'बाबत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 14:06 IST

Narendra Modi: देशात असो जगात नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीच्या घरात आहे

ठळक मुद्देमोदींच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळातही अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मोदींनी सोशल मीडिया अकाऊंट बंद करु नये, मोदी समर्थकांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला खुलासा

नवी दिल्ली - सध्या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक जण सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटर, फेसबुक या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र येतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया आहे. त्यामुळे राजकीय नेते मोठ्या प्रमाणात या माध्यमाचा वापर करताना दिसतात. 

देशात असो जगात नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीच्या घरात आहे. मात्र सोमवारी अचानक नरेंद्र मोदींनी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ माजली होती. टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन असं नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. त्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. 

पण मंगळवारी नरेंद्र मोदींनी याबाबत पुन्हा ट्विट करुन नवीन खुलासा केला आहे. ८ मार्च, रविवारी जागतिक महिला दिन असल्याने त्यादिवशी माझं सोशल मीडियावरील अकाऊंट महिलांसाठी समर्पित करण्यात येणार आहे. यामध्ये ज्या महिलेकडून आपल्या प्रेरणा मिळते तिची यशस्वी गाथा मांडा, लाखो महिलांना प्रेरणा देईल अशा स्टोरी शेअर करा, यासाठी #SheIndpriesUs हा हॅशटॅग वापरा असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फॅन फॉलोअर्स सोशल मीडियावर आहे. कोट्यवधी युजर्स नरेंद्र मोदींना फॉलो करतात. ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून नरेंद्र मोदी जनतेशी संवादही साधतात, मग त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला? हा प्रश्न सर्वांना पडला होता. पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी ट्रेंड पण सुरु करण्यात आला होता. जवळपास ५० हजारांहून जास्त लोकांनी मोदींच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली होती. प्रत्येकाला उत्सुकता होती की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय का घेतला असेल.  पण या उत्तरासाठी रविवारपर्यंत वाट पाहण्यापूर्वीच मोदींनी उत्तर दिलं आहे. 

मोदींच्या या ट्विटवर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या होत्या. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. मोदींनी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्यास ही मंडळी अनाथ होतील. त्यांना अनाथ करणं योग्य नाही. कारण हीच मंडळी त्यांचे सायबर योद्धे आहेत. योद्धे सेनापतींच्या आदेशावरुन काम करतात. पण सेनापतींनीच सोशल मीडियाचं मैदान सोडलं तर मग फौज काय करणार असा सवाल शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला होता. तर राहुल गांधी यांनी मोदींनी द्वेष सोडावा सोशल मीडिया नाही असा चिमटा काढला होता.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकTwitterट्विटर