शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

‘कॅबिनेट’च हवे या आग्रहामुळे प्रफुल्ल पटेल यांचा मंत्रिमंडळातील समावेश लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 06:34 IST

Narendra Modi Oath Ceremony :मोदी मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित झाले असताना त्यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्य मंत्रिपद देऊ केल्यामुळे अडचण निर्माण होऊन पटेल यांचा शपथविधी लांबणीवर पडला आहे.

 नवी दिल्ली  - मोदी मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनप्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित झाले असताना त्यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्य मंत्रिपद देऊ केल्यामुळे अडचण निर्माण होऊन पटेल यांचा शपथविधी लांबणीवर पडला आहे.

संसदेतील ज्येष्ठतेनुसार पटेल कॅबिनेट मंत्रिपदाला पात्र असले तरी शिवसेनेचे लोकसभेवर सात खासदार निवडून आले असताना प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्य मंत्रिपदच दिले जात आहे. अशा स्थितीत लोकसभेवर एकच खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपद दिल्यास महायुतीमुळे नाराजी निर्माण होण्याची शक्यता होती. 

या मुद्यावर खा. सुनील तटकरे यांच्या २, गुरुद्वारा रकाबगंज रोड निवासस्थानी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांची दोन तास गहन चर्चा झाली. पण पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदच दिले जावे, असा आग्रह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरल्यामुळे भविष्यातील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश करण्याचा  तोडगा निघाला.  

प्रफुल्ल पटेल यांची प्रतीक्षा करण्याची तयारीयापूर्वी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद भूषविल्यामुळे आपण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार स्वीकारण्याऐवजी आपण प्रतीक्षा करू, अशी भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी घेतली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये यावरून कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पटेल यांच्यापाठोपाठ तटकरे यांनीही मंत्रिपदावर दावेदारी केल्याचे वृत्त काही काळ पसरले होते. पण ते भ्रामक ठरले. काही दिवस थांबण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविल्याने नाराजी मिटली आहे.

विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद देणार : देवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसला सरकारच्या वतीने राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाराचे मंत्रिपद देऊ करण्यात आले होते. पण प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्री राहिले असल्यामुळे त्यांची अडचण होती.त्यामुळे भविष्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावेळी आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्या. तोपर्यंत आम्ही थांबायला तयार आहाेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत म्हटल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

कॅबिनेट मंत्रिपदासाठी वाट पाहणार : अजित पवार प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्री राहिले असल्यामुळे त्यांनी स्वतंत्र प्रभार असलेले राज्य मंत्रिपद स्वीकारणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहायला तयार आहोत.त्यावर आमची सहमती झाली आहे. आमचे सध्या लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येकी एक खासदार असून, नजीकच्या भविष्यात राज्यसभेच्या आणखी दोन खासदारांची भर पडून आमची संख्या चार होणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNCPराष्ट्रवादी काँग्रेसPraful Patelप्रफुल्ल पटेलCentral Governmentकेंद्र सरकार