शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

२४ तासांत फाइल क्लीअर करा, दबावाला बळी पडू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या नव्या मंत्र्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 07:37 IST

Narendra Modi Oath Ceremony :कोणत्याही मंत्र्याकडे असलेली फाईल २४ तासांपेक्षा जास्त काळ टेबलवर राहणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही मंत्र्याने कोणत्याही अधिकाऱ्याच्या दबावाला बळी न पडता फाईल वाचल्याशिवाय सही करू नये, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे नव्या मंत्र्यांना दिले.

- संजय शर्मानवी दिल्ली -  कोणत्याही मंत्र्याकडे असलेली फाईल २४ तासांपेक्षा जास्त काळ टेबलवर राहणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही मंत्र्याने कोणत्याही अधिकाऱ्याच्या दबावाला बळी न पडता फाईल वाचल्याशिवाय सही करू नये, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे नव्या मंत्र्यांना दिले.

मोदी सरकार ३.० च्या शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी नव्या सरकारच्या मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी चहापानासाठी बोलावले आणि सरकार चालविण्यासाठी ठोस मार्गदर्शक सूचना केल्या. जवळपास दोन तास चाललेल्या पंतप्रधान मोदींच्या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना ताकीद दिली की, कोणत्याही अधिकाऱ्याने कितीही दबाव आणला तरी त्यांनी कोणत्याही फाईलवर पूर्ण वाचल्याशिवाय सही करू नये. 

१०० दिवसांच्या राेडमॅपबाबतही माेदींनी यावेळी चर्चा केली. या राेडमॅपवर काम करायचे आहे तसेच सर्व प्रलंबित याेजना लागू करायच्या आहेत, असे माेदींनी स्पष्ट केले.

पीएमओकडून बारीक लक्ष- पंतप्रधान कार्यालय सर्व मंत्रालयांवर थेट लक्ष ठेवेल. सर्व मंत्र्यांना पारदर्शकतेने काम करण्यास सांगितले आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सर्वांना एकत्र काम करावे लागेल, असेही पंतप्रधानांकडून सांगण्यात आले. - मोदींनी पहिल्या दिवसापासून सर्व मंत्र्यांना त्यांच्या मंत्रालयांसाठी १०० दिवसांचा अजेंडा निश्चित करण्यास सांगितले आहे. तुम्ही लवकरात लवकर कामे पूर्ण करा. टार्गेटची चिंता करा, असे निर्देश माेदींनी दिले.

पर्सनल स्टाफमध्ये नातेवाईक नको- सरकारच्या कार्यपद्धतीकडे लक्ष वेधताना मोदी म्हणाले की, कोणतीही फाईल २४ तासांपेक्षा जास्त काळ टेबलावर राहू नये. - मंत्रालयात फायलींचा ढीग नसावा, जनतेच्या हिताचे निर्णय लवकर घेतले जावेत. कोणत्याही मंत्र्यांनी पर्सनल स्टाफमध्ये आपले कुटुंबीय, नातेवाइकांना स्थान देऊ नये.- मंत्र्यांनी काेणतेही असे काम करू नये, जे करायला नकाे. तसे केल्यास तत्काळ मला माहिती मिळेल, असे माेदी यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा