"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:24 IST2025-07-25T18:23:15+5:302025-07-25T18:24:13+5:30
राहुल गांधी म्हणाले, "तुम्ही हलवा बनवता, पण ते खातात. मी असे म्हणत नाही की त्यांनी हलवा खाऊ नये, पण किमान तुम्हाला तरी मिळायला हवा."

"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
नरेंद्र मोदी हे केवळ दिखावा आहेत, त्यांना खूप जास्त महत्त्व देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात असे काहीही नाही. पंतप्रधान मोदींना दोन-तीन वेळा भेटल्यानंतर आणि त्यांच्यासोबत एकाच रूममध्ये बसल्यानंतर, आपल्या लक्षात आले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासाठी कधीही 'मोठी समस्या' राहिले नाहीत," असे राहुल गांधी यांनी म्हटे आहे. ते दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये बोलत होते.
"मोदींमध्ये दम नाही..." -
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, "माझा वैयक्तिक अनुभव आहे की, त्यांच्यात दम नाही." भारतातील नोकरशाहीतील वंचित आणि उपेक्षित वर्गाच्या प्रतिनिधित्वासंदर्भात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "देशाच्या लोकसंख्येत सुमारे ९०% दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक आहेत. मात्र, अर्थसंकल्पात हलवा वाटत असताना, या ९०% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारे कुणीही नव्हते. ही ९०% लोकसंख्या देशाची उत्पादक शक्ती आहे."
हे काय बोलून गेले राहुल गांधी? -
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढे म्हणाले, "तुम्ही हलवा बनवता, पण ते खातात. मी असे म्हणत नाही की त्यांनी हलवा खाऊ नये, पण किमान तुम्हाला तरी मिळायला हवा." एवढेच नाही तर, "तेलंगणाच्या काँग्रेस सरकारने मिळवलेल्या आकडेवारीचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, तेलंगणात अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायाच्या लोकांना लाखोंचे कोट्यवधींचे पॅकेज मिळत नाही. कारण ते कॉर्पोरेट संस्था आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा भाग नाहीत," असेही राहुल गांधी म्हणाले.