शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य
2
मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...
3
पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
4
करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS
5
"दिवाली हो या होली, अनुष्का लव कोहली", Virat Kohli समोर चाहत्यांची घोषणाबाजी
6
"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
7
याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹१५ च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल
8
सारा अली खानसोबत ब्रेकअपनंतर सिंगल आहे कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं नाव
9
Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
10
अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक
11
अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा
12
PAK vs IRE : पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार?
13
एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड!
14
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव
15
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर
16
'राजकारणातील आयुष्य कठीण', पहिल्याच सिनेमानंतर मिळालेली ऑफर; कंगना रणौतचा खुलासा
17
चार माेठे पाऊस पूर आणणार; मुंबईत मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा 
18
वर्ल्ड कपचे सामने संपले! न्यूयॉर्क येथील स्टेडियम तोडण्यासाठी बुलडोझर पोहोचले, पण का?
19
पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये १५% वाढ; दारूगोळा, हत्यारे खरेदीसाठी ५४८ अब्जची तरतूद!
20
मेहबूबा मेहबूबा! वयाच्या 85 व्या वर्षीही हेलन यांचं जिममध्ये वर्कआऊट; म्हणाल्या, 'नशेसाठी मला...'

अमेरिकेनंतर इजिप्तच्या मशिदीत जाणार PM मोदी; 'या' मुस्लिम समुदायाशी जिव्हाळ्याचे संबंध...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 9:42 PM

भारतात परण्यापूर्वी पीएम नरेंद्र मोदी इजिप्तमधील 1 हजार वर्षे जुन्या अल हकीम मशिदीला भेट देणार आहेत.

Narendra Modi Egypt: अमेरिकेहून भारतात परतण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजधानी कैरो येथील 1000 वर्षे जुन्या प्रसिद्ध अल हकीम मशिदीला ते भेट देतील. या मशिदीचा भारतातील मुस्लिम समुदायाशी विशेष संबंध आहे. या मुस्लिम समाजाचे पंतप्रधान मोदींशी जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा दाऊदी बोहरा समाज आहे. 

इजिप्त सरकारच्या म्हणण्यानुसार, 11व्या शतकातील या मशिदीच्या दुरुस्तीचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू होते. यामध्ये दाऊदी बोहरा समाजाचा मोठा वाटा आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या दुरुस्तीचा उद्देश इजिप्तमध्ये असलेल्या इस्लामिक ठिकाणांच्या पर्यटनाला चालना देणे आहे. खुद्द पीएम मोदींनी या समुदायाला देशभक्त आणि शांततेचे समर्थक म्हटले आहे.  दाऊदी बोहरा समुदाय कोण आहे?

दाऊदी बोहरा समुदाय इस्लामच्या फातिमीद इस्लामिक तय्याबी स्कूलचे पालन करतो. त्यांचा समृद्ध वारसा इजिप्तमध्ये जन्माला आला, त्यानंतर येमेनमार्गे तो 11व्या शतकात भारतात स्थायिक झाले. 1539 नंतर भारतात दाऊदी बोहरा समुदायाची संख्या वाढू लागली. त्यानंतर त्यांनी आपल्या पंथाची जागा येमेनमधून गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर येथे हलवली. आजही या परिसरात त्यांचे वडिलोपार्जित वाडे आहेत. या समाजातील पुरुष पांढरे कपडे आणि सोनेरी टोप्या घालतात, तर महिला रंगीबेरंगी बुरखे घालण्यासाठी ओळखल्या जातात.

दाऊदी बोहरा समाजात शिया आणि सुन्नी, अशा दोन्ही धर्माचे लोक आहेत. शिया समुदाय मुख्यतः व्यवसाय करतो, तर सुन्नी बोहरा समुदाय प्रामुख्याने शेती करतो. संपूर्ण जगात दाऊदी बोहरा समुदायाची संख्या 10 लाखांच्या जवळपास आहे. त्यापैकी निम्मे म्हणजे 5 लाख फक्त भारतात राहतात. बोहरा हा शब्द गुजराती भाषेतील वोरू शब्दावरुन आलाय, ज्याचा अर्थ व्यापार असा होतो. गुजरात व्यतिरिक्त, हा समाज भारतातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात देखील आहे, परंतु त्यांची सर्वात जास्त संख्या गुजरातमधील सुरतमध्ये आहे.

मोदींचा या समाजाशी जुना संबंध 

पंतप्रधान होण्यापूर्वीच नरेंद्र मोदी यांचे दाऊदी बोहरा समाजाशी विशेष संबंध होते. 2011 मध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी समाजाचे प्रमुख सय्यदना बुरहानुद्दीन यांच्या 100 व्या वाढदिवसाच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. नंतर 2014 मध्ये त्यांचे निधन झाल्यावरही मोदी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यानंतर पीएम मोदी आणि बुरहानुद्दीन यांचा मुलगा आणि उत्तराधिकारी सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्याशी चांगले संबंध बनले. 2015 मध्ये पंतप्रधान असतानाही त्यांनी सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांची भेट घेतली होती.

हा समाज मोदींचा समर्थक मोदींनी मुंबईतील सैफी अकादमीच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटनही केले. त्यांनी आपल्या भाषणात या समाजाला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानतो, असे सांगितले होते. दाऊदी बोहरा समुदाय नेहमीच पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभा राहिला आहे. 2014 नंतर जेव्हाही पंतप्रधान मोदी परदेशात कार्यक्रम करतात, तेव्हा या समाजाचे लोक मोठ्या संख्येने तेथे पोहोचतात. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि सिडनी येथील ऑलिम्पिक पार्क अरेना येथे आयोजित कार्यक्रमातही हा समाज मोठ्या संख्येने आला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाMuslimमुस्लीमGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा