शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा तर होणारच! PM मोदींना 'उंदीर', 'रावण' म्हणणारे खर्गे जेव्हा त्यांच्यासोबतच जेवण करतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 20:56 IST

राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हटले जाते. अशाच प्रकारचा एक फोटो सध्या व्हायरल होतोय.

नवी दिल्ली: राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हटले जाते. राजकीय मंचावर भाषेची मर्यादा ओलांडून टीका करणारे नेते खासगीत एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने भेटतात-बोलतात. सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतिशय टोकाची टीका करणारे काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दुपारी मोदींसोबतच जेवणाचा आस्वाद घेतला. 

एकत्र जेवण केलेआज कृषी मंत्रालयाने सर्व खासदारांसाठी विशेष जेवणाची व्यवस्था केली होती. यावेळी खर्गे आणि मोदींची भेट झाली. विशेष म्हणजे, यावेळी खर्गे आणि मोदींनी एकाच टेबलवर बसून जेवण केले. एकीकडे पीएम मोदींवर आग ओकणारे खर्गे आज मात्र अतिशय मवाळ झालेले दिसले. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते. यावेळी या नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. 

नरेंद्र मोदींनी केले ट्विट:-

संसदेत भाषेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या खर्गे यांनी पंतप्रधान मोदींची तुलना उंदराशी केली होती. त्यापूर्वी खर्गेंनी पंतप्रधान मोदींना 'रावण' म्हटले होते. पण, या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. खासदारांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, "आम्ही 2023 हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करण्याची तयारी करत आहोत. आज मी संसदेत खासदारांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी जेवणात बाजरीचे पदार्थ दिले गेले. पक्षाच्या पलीकडे सर्व खासदारांचा सहभाग पाहून आनंद झाला.''

2023 बाजरी वर्ष म्हणून घोषित भारताच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्ताने कृषी मंत्रालयाने खासदारांना विशेष स्नेहभोजन दिले. यात ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ खायला देण्यात आले. पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या विशेष स्नेहभोजनाला हजेरी लावली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाcongressकाँग्रेसRajnath Singhराजनाथ सिंहom birlaओम बिर्ला