शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे विशेष आभार, अशा राजकीय संकटात...', PM मोदींनी काढला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 13:43 IST

आज पीएम नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

नवी दिल्ली :राजस्थानला आज पहिली 'वंदे भारत' एक्सप्रेस ट्रेन मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राजस्थानमधून तर पीएम मोदी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यावेळी पीएम मोदींनी आपल्या भाषणातून गेहलोत यांना टोमणाही मारला. यावेळी जयपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशिवाय राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.

यावेळी पीएम मोदी म्हणाले की, अशोक गेहलोत यांच्या दोन्ही हातात लाडू आहेत. रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, दोघेही राजस्थानचे आहेत.मी आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे विशेष आभार मानतो. ते सध्या मोठ्या राजकीय संकटातून जात आहेत, तरीदेखील या विकासाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळ काढला. मी तुमचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो, असा चिमटा मोटींनी काढला.

पीएम मोदी पुढे म्हणतात, स्वातंत्र्यानंतर लगेच जे काम व्हायला हवे होते, ते काम आम्ही आज करत आहोत. गेहलोत जी, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकून काही कामे माझ्यासमोर मांडली आहेत. तुमचा हाच विश्वास आपल्या मैत्रिची ताकत आहे आणि ती कामे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल धन्यवाद. पीएम मोदींचे हे वक्तव्य यासाठी महत्वाचे मानले जात आहे, कारण सध्या सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. 

पीएम मोदींचे संपूर्ण भाषण:-

जयपूर-दिल्ली ट्रेनला सुरुवातपंतप्रधानांनी अजमेर-दिल्ली कॅंट वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, राजस्थानच्या भूमीला आज पहिली वंदे भारत ट्रेन मिळत आहे. दिल्ली कॅंट अजमेर वंदे भारत एक्सप्रेसने जयपूर ते दिल्ली प्रवास करणे सोपे होईल. राजस्थानच्या पर्यटनातही याचा खूप उपयोग होईल. वंदे भारत एक्सप्रेसचा राजस्थानच्या पर्यटन उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. या आधुनिक गाड्या सुरू झाल्यापासून सुमारे 60 लाख लोकांनी त्यात प्रवास केला आहे. वंदे भारत ट्रेन आज विकासाचे, आधुनिकतेचे प्रतीक आहे. वंदे भारताचा आजचा प्रवास, उद्या आपल्याला विकसित भारताच्या प्रवासाकडे नेईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान