शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi 3.0 : गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र...; भाजप आपल्याकडेच ठेवणार 'CCS' मधील ही महत्वाची मंत्रालयं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 12:00 IST

Narendra Modi 3.0 : कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) मध्ये समाविष्ट असलेली गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र ही चारही महत्वाची मंत्रालये भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याचे समजते...

Narendra Modi-Oath-Ceremony : लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या सलग तिसऱ्या विजयानंतर, आज नरेंद्र मोदीही सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान पदाची हॅट्ट्रिक करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत. आज सायंकाळी 7.15 वाजता मोदी 3.0 च्या शपथविधीचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक परदेशी पाहुन्यांचीही उपस्थिती असेल. दरम्यान, शपथ विधासाठी संभाव्य मंत्र्यांना फोनही येऊ लागले आहेत. महत्वाचे म्हणजे, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) मध्ये समाविष्ट असलेली गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र ही चारही महत्वाची मंत्रालये भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याचे समजते.

माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, भाजप गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षणसारखी मंत्रालये आपल्याकडेच ठेवणार आहे. ही मंत्रालये मोदी सरकारच्या गेल्या दोन्ही कार्यकाळात भाजपकडेच होती. यातच, ज्या माजी केंद्रीय मंत्र्यांना फोन गेला आहे, त्यांत राजनाथ सिंह, नितिन गडकरी, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया, ज्योतिरादित्य शिंदे आणि जितेंद्र सिंह आदींचा समावेश आहे.

यातच, लोकसभा अध्यक्षपदासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. या पदावर मित्रपक्षांचेही लक्ष आहे. एनडीए सरकारच्या गेल्या दोन कार्यकाळांत भाजप नेत्या सुमित्रा महाजन आणि ओम बिर्ला हे लोकसभाध्यक्ष होते.

मोदी शपथविधीपूर्वी मंत्री परिषदेच्या सदस्यांची भेट घेणार - मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली आणि राष्ट्रपती भवनाभोवती अभेद्य सुरक्षा व्यवस्था असणार आहे. दरम्यान, पाच वाजल्यापासूनच पाहुणे राष्ट्रपती भवनात पोहोचण्यास सुरुवात होईल आणि 7:15 वाजता शपथविधी समारंभाला सुरुवात होईल.

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४