शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

साडेचार वर्षांत मोदींनी गमावला मंत्रिमंडळातील तिसरा सहकारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 11:44 AM

अनंत कुमार यांच्या रूपात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या साडे चार वर्षांतील कार्यकाळामध्ये मंत्रिमंडळातील तिसऱ्या सहकाऱ्याला गमवावे लागले आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे कर्नाटकमधील दिग्गज नेते अनंत कुमार यांचे आज निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि भाजपाची मोठी हानी झाली असून, अनंत कुमार यांच्या रूपात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या साडे चार वर्षांतील कार्यकाळामध्ये मंत्रिमंडळातील तिसऱ्या सहकाऱ्याला गमवावे लागले आहे. अनंतकुमार यांच्या आधी मोदींच्या मंत्रिमंडळातील अन्य दोन सदस्यांचेही अकाली निधन झाले होते. 2014 साली भाजपाला केंद्रात सत्ता मिळून मंत्रिमंडळाचा शपथविधी उरकल्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रीत ज्येष्ठ नेते आणि मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री गोपिनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र अकाली निधनामुळे सर्वात कमी काळ मंत्रिपदी राहणाऱ्या मंत्र्यांमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली. 

 त्यानंतर गतवर्षी मे महिन्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचेय निधन झाले होते. पर्यावरणवादी म्हणून अनिल दवे यांची ओळख होती. त्यांनी आपले संपूर्ण जीवन नर्मदा नदी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी खर्च केले होते.  

दरम्यान, आज निधन झालेले केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी कर्नाटकमध्ये भाजपाची पाळेमुळे रुजवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही अनंत कुमार यांचा समावेश होता. त्यावेळी मंत्रिमंडळामधील ते सर्वात तरुण मंत्री ठरले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा