शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांच्या भेटीनंतर राणेंच्या चेह-यावर ‘स्माईल’! दिल्लीत रात्री उशिरा खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 10:18 IST

अमित शहांच्या भेटीनंतर नारायण राणे, फडणवीस, शेलार हे तिघंही एकाच गाडीतून जाताना दिसले, पाठोपाठ नितेश राणे बाहेर पडले.

नवी दिल्ली : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांना भाजपाकडून मंत्रीपद दिलं जाणार असल्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा आहे. काल रात्री उशीरा राजधानी दिल्लीमध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपाकडून आयोजित 19 मुख्यमंत्र्यांच्या एका परिषदेला देवेंद्र फडणवीस सकाळीच दिल्लीत पोहोचले होते. मात्र, सायंकाळी दिल्लीत राणेंनीही उपस्थिती लावल्यामुळे विविध चर्चा रंगल्या. भाजपमधील बड्या नेत्यांच्या भेटीसाठी ते दिल्लीत दाखल झाल्याचे बोलले जात होते. अखेर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी रात्री उशीरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आणि नारायण राणे यांच्यात चर्चा झाली. दिल्लीतील 11 अकबर रोड येथे जवळपास एक तासाहून जास्त वेळ ही बैठक सुरू होती. दरम्यान, राणे यांचा राज्यात मंत्रीमंडळ प्रवेश करायचा की त्यांना राज्यसभेवर दिल्लीत पाठवायचं यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी नितेश राणे हे देखील उपस्थित होते अशी माहिती आहे.  विशेष म्हणजे शहांच्या भेटीनंतर नारायण राणे, फडणवीस, शेलार हे तिघंही एकाच गाडीतून जाताना दिसले. यावेळी राणेंनी पत्रकारांकडे पाहून एक गोड स्माईल दिली. त्यामुळे राणेंची इच्छापूर्ती झाल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली.  पुढच्या महिन्यात राज्यसभा निवडणुका आहेत. महाराष्ट्रातून सहा जागा रिक्त झाल्या आहेत. त्यातील तीन जागा भाजप सहज जिंकू शकणार आहे. त्या दृष्टीनं राणेंना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीत पाठवण्याचा विचार भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे. अमित शहांसोबत झालेल्या भेटीदरम्यान याबाबत खलबतं झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नारायण राणे यांनी आमदारकी सोडत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी भाजपच्या सल्ल्याने महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली आणि आपल्या पक्षाचा एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला. याबदल्यात त्यांना मंत्रिपद दिले जाईल असे आश्वासन भाजपाने दिल्याचे बोलले गेले. पण अद्यापही भाजपाने राणेंना ताटकळत ठेवलं आहे.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहNew Delhiनवी दिल्लीministerमंत्रीBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलार