शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नारंग हल्ला प्रकरण : ३०० जणांवर गुन्हा, भाजप पुढील कार्यवाही पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 04:51 IST

Narang attack case News : याप्रकरणी लखनपाल सिंह, सुखदेव सिंह, निर्मल सिंह जस्सेवाला, नानकसिंह फकरसर, कुलविंदरसिंह दानेवाला, राजविंदरसिंह जंडवाला, अवतार सिंह यांच्यासह जवळपास ३०० अज्ञात शेतकऱ्यांना आरोपी बनवले गेले आहे.

- बलवंत तक्षक चंदीगड : पंजाबमध्ये भाजपचे अबोहर मतदारसंघाचे आमदार अरुण नारंग यांना मारहाण करणे, चेहऱ्यावर काळा रंग फासणे आणि कपडे फाडल्याच्या आरोपावरून मुक्तरस जिल्ह्यातील मलोट पोलीस ठाण्यात ३०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी लखनपाल सिंह, सुखदेव सिंह, निर्मल सिंह जस्सेवाला, नानकसिंह फकरसर, कुलविंदरसिंह दानेवाला, राजविंदरसिंह जंडवाला, अवतार सिंह यांच्यासह जवळपास ३०० अज्ञात शेतकऱ्यांना आरोपी बनवले गेले आहे.आमदार नारंग यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. राज्यपाल व्ही.पी. सिंह बदनौर यांची शर्मा यांनी भेट घेऊन त्यांना घडलेली घटना सांगितली. पंजाब सरकारचे हे अपयश असल्याचे सांगून हल्ल्याचा निषेध केला.   दरम्यान, नारंग म्हणाले की, असे हल्ले करून पंजाब सरकार भाजप कार्यकर्त्यांना खचवू पाहते; परंतु असे होणार नाही.  

राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेता येणार नाही. अशा हिंसक मार्गांनी आंदोलक शेतकऱ्यांनीही जायला नको.-कॅप्टन अमरिंदर सिंग, मुख्यमंत्री, पंजाब

आमदार अरुण नारंग यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सन्मान राखण्यात राज्याच्या पोलिसांना अपयश आले. या अपयशाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तटस्थ चौकशी व्हायला हवी.-सुखबीरसिंग बादल, प्रदेशाध्यक्ष, शिरोमणी अकाली दल, पंजाब   

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनPunjabपंजाबBJPभाजपाMLAआमदारcongressकाँग्रेस