शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लखनौमध्ये नमाज विरुद्ध सुंदरकांड पाठ; मॉलमध्ये नमाज पठणाच्या घटनेवर हिंदू संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:58 IST

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे नवीन सुरू झालेल्या लुलू मॉलमध्ये नमाज अदा केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक झाली असून, सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरला आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशातील लखनौच्या लुलू मॉलमध्ये (LuLu Mall)झालेल्या नमाजामुळे वाद वाढत चालला आहे. हिंदू संघटना अखिल भारत हिंदू महासभेने लुलू मॉलमध्ये सुंदरकांड कार्यक्रम करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांच्या घरावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा लुलू मॉल आणि नमाजाचा नेमका वाद काय आहे.?

नेमका काय वाद आहे?उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये लुलू मॉल सुरू होऊन एक आठवडाही झालेला नाही, तोच एक वाद सुरू झाला आहे. वादाचे कारण म्हणजे एकापाठोपाठ एक दोन व्हिडिओ समोर आले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये लुलू मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर काही लोक नमाज अदा करताना दिसत होते. या व्हिडिओवरून गदारोळ झाला आहे. हिंदू महासभेसोबतच अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी हे थांबवावे अन्यथा मॉलमध्ये हनुमान चालीसा आणि सुंदरकांडचे पठण करू, असा इशारा दिला आहे. दरम्यान, मॉल व्यवस्थापनाने दावा केला की, त्यांचा नमाज अदा करणाऱ्या लोकांशी काहीही संबंध नाही, म्हणून त्यांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आणखी एक व्हिडिओ समोर आलाहिंदू महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांनी या घटनेला 24 तासही उलटले नसताना आणखी एक व्हिडिओ जारी केला. त्यात दुसऱ्यांदा मॉलमध्ये नमाज अदा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी व्हिडिओमध्ये 2 लोक मॉलमध्ये नमाज अदा करताना दिसत आहेत. शिशिर चतुर्वेदी यांनी दावा केला की, हा मॉल एका खास उद्देशाने बांधण्यात आला आहे. शिशिर चतुर्वेदी यांनी आरोप केला आहे की मॉलमधील 80 टक्के कर्मचारी मुस्लिम आहेत आणि केवळ 20 टक्के हिंदू आहेत. हिंदूंमध्ये फक्त हिंदू मुलींना कामावर ठेवण्यात आले आहे. पण, मॉल व्यवस्थापनाने हा आरोप फेटाळला आहे. 

अशी घटना पुन्हा घडणार नाहीदरम्यान, मॉलचे व्यवस्थापक कर्मचार्‍यांची यादी घेऊन शिशिर चतुर्वेदी यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी केलेला आरोप खोटा असल्याचे सांगितले. पण शिशिर चतुर्वेदी यांचा त्यांच्या यादीवर विश्वास नाही. सध्या लुलू मॉलचे जीएम चतुर्वेदींच्या घरी पोहोचले. त्यांनी अशी घटना पुन्हा घडणार नाही आणि दोषी पकडले जातील, असे आश्वासन दिले. त्यामुळे सध्या शिशिर चतुर्वेदी यांनी लुलू मॉलमधील सुंदरकांड पठणाचा आग्रह काही काळासाठी पुढे ढकलला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ