लग्नानंतर पतीला सोडून प्रियकराच्या घरी आली पण त्याने दिला ओळखण्यास नकार, गेला पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:15 IST2023-07-26T16:14:38+5:302023-07-26T16:15:21+5:30
प्रियकराच्या सांगण्यावरून एक तरुणी पतीचे घर सोडून त्याच्या घरी गेली. प्रियकरासोबत राहण्याच्या इच्छेने तिने आपलं घर उद्ध्वस्त केलं.

लग्नानंतर पतीला सोडून प्रियकराच्या घरी आली पण त्याने दिला ओळखण्यास नकार, गेला पळून
बिहारमध्ये प्रियकराच्या सांगण्यावरून एक तरुणी पतीचे घर सोडून त्याच्या घरी गेली. प्रियकरासोबत राहण्याच्या इच्छेने तिने आपलं घर उद्ध्वस्त केलं. प्रेयसी प्रियकराच्या घरी पोहोचली तेव्हा त्याने प्रेयसीला ओळखण्यास नकार दिला. एवढेच नाही तर तरुणीला सोडून तो गुजरातला पळून गेला. प्रियकराच्या विश्वासघाताने दुखावलेली तरुणी आता घरासमोर धरणं धरून बसली आहे. गेल्या पाच दिवसांपासून ती प्रियकराच्या घरासमोर तहान-भूक विसरून बसली आहे.
बिहारच्या नालंदा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथील एका गावातील सिंटू कुमारवर त्याची विवाहित मैत्रीण अंजनी कुमारी हिने आरोप केला आहे की, सिंटूने तिला पतीचे घर सोडून त्याच्याकडे येण्यास सांगितले. तो तिला पत्नी म्हणून आपल्याजवळ ठेवेल असंही म्हणाला. यानंतर ती सिंटू कुमारकडे पोहोचली तेव्हा त्याने तिला ओळखण्यास नकार दिला. एवढेच नाही तर तो सुरत सोडून पळून गेला.
अंजनीच्या लग्नाला दोन महिनेही पूर्ण झालेले नाहीत. इस्लामपूरच्या मिल्की महुआरी गावातील रोशन कुमारसोबत तिचा विवाह 3 जून रोजी झाला होता. लग्नानंतरही अंजनीचा प्रियकर तिच्याशी सतत बोलत होता. तो तिला पतीपासून दूर राहण्यास सांगत असे. काही दिवसांपूर्वी प्रेमाचा हवाला देत त्याने अंजनीला पतीचे घर सोडून त्याच्या घरी येण्यास सांगितले. सिंटूचं ऐकून अंजनी आपल्या पतीचं घर सोडून प्रियकरापर्यंत पोहोचली, मात्र येथे प्रियकराने तिला ओळखण्यास नकार दिला.
अंजनीने पतीचं घर सोडलं आहे जिथे ती आता परत येऊ शकत नाही. प्रियकरही तिला सोडून पळून गेला आहे. तिचा नवीनच सुरू झालेला संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहे. प्रियकराच्या वागण्यामुळे दुखावलेली अंजनी आता गेल्या पाच दिवसांपासून प्रियकराच्या घरासमोर धरणे धरून बसली आहे. गावकऱ्यांनी तिला काही खायला दिले तर ती खाते. तरुणी आणि तिच्या प्रियकराचे घर एकाच गावात आहे. पतीचे घर सोडल्यानंतर तिच्या पालकांनीही तिच्याशी संबंध तोडले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.