कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:53 IST2025-05-17T12:52:46+5:302025-05-17T12:53:23+5:30
स्थानिक सुरक्षा यंत्रणेने तिला ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. सुनीता पाकिस्तानी तपास यंत्रणेच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे.

कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
भारत-पाकिस्तान यांच्या तणावात नागपूरमधील ३६ वर्षीय महिला सुनीता काश्मीरच्या कारगिलमधून एलओसी रेषा पार करून पाकिस्तानात पोहचली आहे. या घटनेने भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थाही हैराण आहे. पाकिस्तानातील एका पादरीला भेटण्यासाठी सुनीताने हे धाडस केले. पादरीसोबत सुनीताची ऑनलाईन ओळख झाली होती. याआधीही तिने दोनदा नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला परंतु तिसऱ्या प्रयत्नात ती पाकिस्तानात पोहचली. याआधी दोन वेळा अटारी बॉर्डरवर तिला थांबवण्यात आले होते.
मंगळवारी सुनीताने तिच्या मुलाला कारगिलच्या सीमाभागातील हंदरमाण येथे एकटे सोडून एलओसी पार केली. मी लवकर येईन असं तिने मुलाला सांगितले परंतु उशीर झाला तरी ती न परतल्याने स्थानिकांनी लडाख पोलिसांना ही घटना कळवत मुलाला त्यांच्याकडे सुपूर्द केले. भारतीय अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे सीमेपलीकडे तिला पकडल्याची पुष्टी केली नाही. परंतु टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने सुनीताला पाकिस्तानच्या गावात पाहिले, त्यानंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणेने तिला ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. सुनीता पाकिस्तानी तपास यंत्रणेच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे.
तर सुनीता मानसिक रुग्ण आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. याआधीही सुनीताने दोन वेळा भारताची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. मार्चमध्ये अमृतसर पोलिसांनी सुनीता आणि तिच्या मुलाला अटारी बॉर्डरवर पकडले. कुठल्याही कागदपत्राविना ती पाकिस्तानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होती असं तिच्या कुटुंबाने सांगितले. ही महिला प्रत्यक्षात पाकिस्तानात पोहचली होती. तपासात २०२० मध्ये तिचा घटस्फोट झाला होता तेव्हापासून ती आणि मुलगा वेगळे राहत असल्याचे समोर आले असं कारगिलमधील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
नेमकी घटना काय?
नागपूरची एक ३६ वर्षीय महिला आपल्या १५ वर्षांच्या मुलासह कारगिलमध्ये आली होती. मुलाला हॉटेलमध्ये एकटे सोडून ती गावात गेली आणि परतलीच नाही. ही घटना १४ मे रोजी घडली. ही महिला ९ मे रोजी आपल्या मुलासह एका हॉटेलमध्ये थांबली होती. १४ मे रोजी ती हंदरमाण गावात गेली, पण परतली नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब पोलिसांना कळवली.पोलिसांनी मुलाची चौकशी केल्यावर कळले की ते दोघं पंजाबमधून प्रवास करत कारगिलला आले होते. महिला तिच्या पतीपासून काही वर्षांपूर्वी वेगळी राहत होती. तीने यापूर्वी नागपूर आणि मुंबईतील रुग्णालयांमध्ये नर्स म्हणून काम केले आणि आता ती टेलरिंगचा व्यवसाय करत होती.