बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:41 IST2025-07-31T12:41:21+5:302025-07-31T12:41:47+5:30
Nag Panchami: नागाला मारलेल्यांच्या घरात नाग पंचमीलाच नागीण सापडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि गावकऱ्यांनी उभी रात्र जागून काढली.

बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
नागाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नागीण आली असे ऐकले तरी अंगावर शहारे येतात. हा शहारे येणारा प्रकार उत्तर प्रदेशच्या एटामध्ये घडला आहे. महाराष्ट्रापेक्षा १५ दिवस आधी उत्तर प्रदेशमध्ये सणवार सुरु होतात. श्रावण महिन्यात एका कुटुंबाकडून चुकून नाग मारला गेला होता. त्यांनी त्याला मुद्दामहून मारले नव्हते. नाग पंचमीच्या दिवशी या कुटुंबाच्या घरात नागीण सापडल्याने खळबळ उडाली आहे. नागिणीला पाहून कुटुंबाला चांगलाच धक्का बसला होता. त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यूच दिसत होता. गावकऱ्यांना ही गोष्ट कळताच त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली होती.
नागाला मारलेल्यांच्या घरात नाग पंचमीलाच नागीण सापडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि गावकऱ्यांत ती नागीण बदला घेण्यासाठीच आल्याचे बोलले जाऊ लागले. याच दहशतीत गावकऱ्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी खूप शोधाशोध केल्यानंतर ती नागीण सापडली, परंतू गावकऱ्यांना काही त्या उभ्या रात्री झोप लागली नाही. सर्वांनी लाईट सुरु ठेवून पाळत ठेवली होती.
अलीगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील सरौतिया गावातला हा प्रकार आहे. नागपंचमीच्या दिवशी प्रवेश दीक्षितच्या घरातून नागीण बाहेर पडली. १५ दिवसांपूर्वी एक नाग मेला होता. नागिणीने रात्रभर गावकऱ्यांना दहशतीत ठेवले. नागाचा बदला घेण्यासाठी ती आली होती. सकाळ होताच गावकऱ्यांनी ताबडतोब वन विभागाच्या पथकाला बोलावले. नागीण सारखी आपला फणा काढून फुत्कारत होती, असे गावकऱ्यांनी सांगितले.
नागाला मारल्याचा बदला घेण्यासाठी नागीण येते, हे आपण जुन्या लोकांकडून, चित्रपटांतून अनेकदा पाहिलेले ऐकलेले आहे. खरे खोटे काय, यापेक्षा ग्रामीण भागात नागीण बदला घेते किंवा सापाला दुखावले तर तो बदला घेतो असे मानले जाते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसाळ्यामुळे घरांमध्ये उंदीर मारल्याने साप बाहेर येण्याची शक्यता वाढते.