नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 21:44 IST2025-08-15T21:37:36+5:302025-08-15T21:44:50+5:30

नागालँडचे राज्यपाल एल. गणेशन यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Nagaland Governor L Ganesan passes away, was admitted to a Chennai hospital due to head injury | नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

नागालँडचे राज्यपाल एल. गणेशन यांचे शुक्रवारी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल होते. राज्यपाल कार्यालयाने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

८ ऑगस्ट रोजी चेन्नईतील त्यांच्या घरी अचानक पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. 

४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा

मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ला गणेशन यांची १२ फेब्रुवारी २०२३ रोजी नागालँडचे २१ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी पदभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील विकास आणि शांतता प्रयत्नांवर भर दिला.

नागालँड आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Web Title: Nagaland Governor L Ganesan passes away, was admitted to a Chennai hospital due to head injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.