जयललितांच्या मृत्यूचे रहस्य वाढले, समोर आला रुग्णालयातील पहिला व्हिडिओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 02:25 PM2017-12-20T14:25:59+5:302017-12-20T14:35:28+5:30

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यमागील संशयाचे धुके अद्यापही विरलेले नाही. जयललितांचा मृत्यू नेमका झाला? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याऐवजी त्यांच्या मृत्युमागील रहस्य दिवसेंदिवस अधिकच गुढ होत चालले आहे.

The mystery of Jayalalitha's death grew, the hospital's first video appeared before | जयललितांच्या मृत्यूचे रहस्य वाढले, समोर आला रुग्णालयातील पहिला व्हिडिओ 

जयललितांच्या मृत्यूचे रहस्य वाढले, समोर आला रुग्णालयातील पहिला व्हिडिओ 

Next

चेन्नई - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यमागील संशयाचे धुके अद्यापही विरलेले नाही. जयललितांचा मृत्यू नेमका झाला? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याऐवजी त्यांच्या मृत्युमागील रहस्य दिवसेंदिवस अधिकच गुढ होत चालले आहे. दरम्यान, बुधवारी जयललिता यांचा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 
या व्हिडिओमध्ये जयललिता रुग्णालयातील बेडवर बसलेल्या आहेत. तसेच ज्युससारखे पेय पीत त्या टीव्ही पाहताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा व्हिडिओ टीटीव्ही दिनकरन यांच्या गटातील आमदाराने प्रसारित केला आहे. गतवर्षी गंभीर आजारपणानंतर 74 दिवस रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जयललितांचे 5 डिसेंबर 2016 रोजी निधन झाले होते.
 
अपोलो रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा खोटा


तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांना गेल्या वर्षी 22 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांचा श्वास सुरू नव्हता, असे अपोलो रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तसेच उपचारांदरम्यान जयललितांसोबत तेच लोक होते. ज्यांच्या नावांना त्यांनी पसंती दिली होती, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र अपोलो रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले हे दोन्ही दावे खोटे असल्याचे सिद्ध झाले आहेत. 

अगतिक झाल्याने प्रसारित केला व्हिडिओ 

जयललिता यांचा हा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या पी. वेत्रिवेल यांनी सांगितले की, रुग्णालयात जयललिता यांना रुग्णालयात कुणाला भेटू दिले गेले नाही ही बाब चुकीची आहे. आम्ही व्हिडिओ प्रसारिक करू इच्छित नव्हतो. पण आमच्यासमोर काहीही पर्याय नव्हता. तसेच जयललितांच्या मृत्यूची चौकशी करत असलेल्या चौकशी आयोगानेही आम्हाला आद्याप बोलावलेले नाही. जर आयोगाने बोलावले तर आम्ही त्यांच्यासमोर पुरावे सादर करू.

व्हिडिओचे आर.के.नगर पोटनिवडणुकीशी कनेक्शन

एआयएडीएमकेचे नेते असलेले टीटीव्ही दिनकरन आर.के. नगर मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सांगितले की, अपोलो रुग्णालयात जयललितांवर उपचार सुरू होते याचा हा व्हिडिओ पुरावा आहे. मात्र  हा व्हिडिओ प्रसारित करण्यामागे आ.के. नगर विधानसभा पोटनिवडणुकीचे कोणतेही कनेक्शन नसल्याचे वेत्रिवेल यांनी सांगितले आहे. 

Web Title: The mystery of Jayalalitha's death grew, the hospital's first video appeared before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.