म्यानमारप्रमाणे भारतात विध्वंसक भूकंप येणार? IIT कानपूरच्या शास्त्रज्ञाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:02 IST2025-04-01T17:01:51+5:302025-04-01T17:02:12+5:30

Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपामुळे आतापर्यंत 2 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक गंभीर जखमी आहेत.

Myanmar Earthquake: Will a devastating earthquake happen in India like Myanmar? IIT Kanpur scientist warns | म्यानमारप्रमाणे भारतात विध्वंसक भूकंप येणार? IIT कानपूरच्या शास्त्रज्ञाने दिला इशारा

म्यानमारप्रमाणे भारतात विध्वंसक भूकंप येणार? IIT कानपूरच्या शास्त्रज्ञाने दिला इशारा

India Earthquake Risk like Myanmar :म्यानमारमध्ये शुक्रवारी (28 मार्च) 7.7 आणि 6.4 रिश्टर स्केलचे दोन भयानक भूकंप झाले. या भूकंपांमुळेम्यानमारमध्ये प्रचंड विध्वंस झाला, ज्यात आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. 300 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. म्यानमारमधील या भूकंपाचा धक्का शेजारील देश थायलंडलाही बसला आहे. दरम्यान, आता भारतातही म्यानमारसारखा भूकंप येण्याचा इशारा तज्ञाने दिला आहे.

आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे प्राध्यापक जावेद मलिक म्हणाले की, 'म्यानमार आणि बँकॉकमध्ये झालेल्या भीषण भूकंपाचे मूळ कारण सागिंग(Sagaing) फॉल्ट आहे.  सागिंग फॉल्ट अतिशय धोकादायक असून, नकाशाद्वारे हा फॉल्ट सहज पाहता येतो.

सिलीगुडीमध्ये आहे गंगा-बंगाल फॉल्ट
मलिक म्हणाले, भारताच्या पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये गंगा-बंगाल फॉल्ट आहे, तर म्यानमारमध्ये सागिंग फॉल्ट आहे. या दोन फॉल्टमध्ये इतर अनेक फॉल्ट लाइन्स आहेत. अशा परिस्थितीत, एक फॉल्ट सक्रिय झाल्यामुळे दुसरा फॉल्टदेखील सक्रिय होऊ शकतो आणि यामुळेच भारतातदेखील भयंकर भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ते पुढे म्हणाले, सागिंग हा फार जुना फॉल्ट आहे. उत्तर-पूर्व शिअर झोन हा आराकान ते अंदमान आणि सुमात्रा पर्यंतच्या सबडक्शन झोनचा एक भाग आहे. अगदी सागिंग फॉल्टही जमिनीवरून दिसतो. जपानी आणि युरोपियन तज्ञांनी सागिंगवर काम केले आहे. अनेक संशोधनातून असेही समोर आले आहे की, येथे दर 150 ते 200 वर्षांनी भूकंपाची वारंवारता असते. याचा अर्थ इतका मोठा भूकंप इतक्या वर्षांत एकदाच होतो.

भारताच्या झोन-5 वर विशेष लक्ष देण्याची गरज 
मलिक पुढे म्हणतात, भारतात कोणत्याही मोठ्या भूकंपाची आपण वाट पाहू नये. हिमालयात अनेक सक्रिय फॉल्ट लाइन्स आहेत. अशा परिस्थितीत या क्षेत्रांमध्ये प्रचंड संशोधनाची गरज आहे. याशिवाय या भागात जास्तीत जास्त सावधगिरी बाळगून भूकंपाचा प्रभाव कमी करण्याचे काम करण्यात यावे.

Web Title: Myanmar Earthquake: Will a devastating earthquake happen in India like Myanmar? IIT Kanpur scientist warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.