शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नीरव मोदी प्रकरणाची चौकशी थांबवण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्याची बदली?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 6:21 PM

बदलीविरोधात सीबीआय अधिकारी मनीष कुमार सिन्हा सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली : मोदी सरकार आणि सीबीआयमधील संघर्ष अद्याप सुरूच आहे. आज सीबीआयमधील एका अधिकाऱ्यानं सर्वोच्च न्यायालयात त्याच्या बदलीला आव्हान दिलं आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि नीरव मोदीच्या पीएनबी बँकेतील घोटाळ्याची चौकशी थांबवण्यासाठी आपली बदली नागपुरला करण्यात आली, असा गंभीर आरोप सीबीआयचे डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी केला आहे. आपल्या बदलीचा आदेश रद्द करण्यात यावी, अशी मागणी सिन्हा यांनी न्यायालयाकडे केली. नीरव मोदी, मेहुल चौक्सी यांनी केलेल्या घोटाळ्यावरुन काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थान यांच्यावर लाचखोरीचा आरोप आहे. या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या पथकात मनीष कुमार सिन्हा यांचा समावेश होता. मात्र त्यांची नागपुरला बदल करण्यात आली. या आदेशाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाकडे मनीष कुमार सिन्हा यांनी याचिका दाखल केली आहे. या घटनापीठात न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हेच घटनापीठ सीबीआय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुनावणी घेणार आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. आलोक वर्मा यांना मोदी सरकारनं पदावरुन तडकाफडकी हटवलं आहे. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNarendra Modiनरेंद्र मोदीCBIगुन्हा अन्वेषण विभाग