शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माझं जीवन पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्पित- अमर सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 18:47 IST

समाजवादी पार्टीचे पूर्वाश्रमीचे नेते अमर सिंह लवकरच भाजपावासी होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- समाजवादी पार्टीचे पूर्वाश्रमीचे नेते अमर सिंह लवकरच भाजपावासी होण्याची शक्यता आहे. परंतु अद्यापही याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. खरं तर अमर सिंह काल लखनऊमधल्या योगी आदित्यनाथांच्या कार्यक्रमात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्यामुळे ते भाजपामध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.विशेष म्हणजे काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाषणामध्ये अमर सिंह यांचा उल्लेख केला होता. ज्या नेत्यांचे उद्योगपतींबरोबर फोटो नाहीत. त्यांनीही उद्योगपतींच्या घरी दंडवत घातले आहेत, अमर सिंहांकडे अशा सर्वांची कुंडली आहे, असंही मोदी म्हणाले होते. त्यानंतरही अनेक कार्यक्रमात अमर सिंह मोदींबरोबर दिसले होते. अमर सिंहांनीही मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. ते म्हणाले, आता माझं समाजवादी पार्टीशी काहीही देणं-घेणं नाही. मी माझं जीवन पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्पित केलं आहे. आता मी कुठेही जाणार नाही.मीडिया रिपोर्टनुसार, भाजपा अमर सिंहांचा उपयोग उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी करत आहे. यापूर्वीही अमर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. तसेच भाजपात सहभागी होणार असल्याचे अमर सिंह यांनी स्वतः सूतोवाच केले आहेत. परंतु अद्यापही मला भाजपाकडून तसं कोणतंही आमंत्रण मिळालेलं नाही, असंही अमर सिंहांनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथSamajwadi Partyसमाजवादी पार्टी