शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या द्वेषावर माझं प्रेम भारी पडलं; व्हॅलेंटाईन डेला राहुल गांधींचा 'प्रेम राग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 12:49 IST

काँग्रेस-भाजपाचा संघर्ष वैचारिक असल्याचं म्हणत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

अजमेर: सध्या देशात दोन विचारसरणींमध्ये लढा सुरू आहे. एका बाजूला भाजपा-संघाची विचारधारा आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसची विचारसरणी आहे, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. अजमेरमध्ये सेवादलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपा आणि संघ द्वेष पसरवतो. आम्ही मात्र प्रेमच पसरवतो. मोदी शिव्या देतात. काँग्रेस संपवायची भाषा करतात. मात्र मोदींच्या द्वेषावर माझं प्रेम भारी पडतं आहे, असं राहुल गांधी सेवादलाला संबोधित करताना म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आक्रमक पवित्र्यात आहेत. राफेल विमान खरेदी करारावरुन राहुल दररोज मोदींना लक्ष्य करत आहेत. याशिवाय सोशल मीडियावरुनही ते सतत मोदींना लक्ष्य करत आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं राहुल गांधी राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. या दोन राज्यांमध्ये ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि जनसभांना संबोधित करतील. राजस्थानात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळवला आहे. याशिवाय जवळपास सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसनं भाजपाला टक्कर दिली होती.  राजस्थानात काँग्रेस 20 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केला. राजस्थानात लोकसभेच्या 25 जागा आहेत. या सर्वच्या सर्व जागा भाजपानं गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. राजस्थाननंतर काँग्रेस अध्यक्ष मोदींचं होम ग्राऊंड असलेल्या गुजरातचा दौरा करतील. गुजरातमधील वलसाडमध्ये राहुल एका जनसभेला संबोधित करतील. डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं भाजपाला जोरदार लढत दिली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसला अच्छे दिन येणार असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRajasthanराजस्थानGujaratगुजरातLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९