'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:38 IST2025-08-08T19:24:34+5:302025-08-08T19:38:22+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फोनवर चर्चा केली. यामध्ये युक्रेन युद्ध आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

My friend Putin PM Modi speaks to Russian President amid Trump's tariff war; invites him to visit India | 'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले

'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर ५० टक्क्यांपर्यंत कर लादले आहेत. भारत रशियाकडून तेल आयात करतो म्हणून हे कर लादण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, परस्पर संबंध आणि भविष्यातील योजनांवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा भारताच्या शांततेच्या धोरणाचा पुनरुच्चार केला.  राष्ट्रपती पुतिन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले. यादरम्यान त्यांनी पुतिन यांच्याकडून युक्रेनशी संबंधित अलीकडील परिस्थितीबद्दलही विचारपूस केली.

Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला

भारताचे शांततेचे धोरण

'भारताला नेहमीच युद्धाचा शांततापूर्ण तोडगा हवा असतो. कोणताही संघर्ष संवाद आणि राजनयिकतेने सोडवला पाहिजे, असे भारताचे धोरण आहे.

चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियामधील जुन्या आणि मजबूत संबंधांवरही चर्चा केली आणि दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत केले जातील यावर दोघांनीही सहमती दर्शवली.

पुतिन यांना भारत भेटीचे आमंत्रण

भारत आणि रशिया ऊर्जा, संरक्षण, अंतराळ आणि व्यापार अशा अनेक क्षेत्रात एकमेकांशी सहकार्य करतात. ही भागीदारी पुढे नेण्यासाठी येत्या काही महिन्यांत अधिक चर्चा नियोजित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

पंतप्रधान मोदींनी या वर्षी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेची ही २३ वी आवृत्ती असेल, ही दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी काम करेल.

Web Title: My friend Putin PM Modi speaks to Russian President amid Trump's tariff war; invites him to visit India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.