माझे रक्त उसळतेय, ...तर त्यांची रस्त्यावर नग्न धिंड काढली जाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:52 IST2025-03-17T12:51:08+5:302025-03-17T12:52:34+5:30
रेड्डी विधानसभेत म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री आहे म्हणून मी गप्प आहे असे समजू नका. मी तुम्हाला नग्न करून मारहाण करेन. मी माझ्या पदामुळे सहनशीलता बाळगत आहे. आता मी जे काही करेन ते कायद्याच्या कक्षेत राहून करेन, असेही रेड्डी म्हणाले.

माझे रक्त उसळतेय, ...तर त्यांची रस्त्यावर नग्न धिंड काढली जाईल
हैदराबाद : ‘माझ्याविरुद्ध अपशब्द काढणाऱ्यांची रस्त्यावर नग्न धिंड काढली जाईल आणि त्यांना चोप दिला जाईल’, असे वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काढले आहे. रेड्डी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या आरोपाखाली राज्यात दोन महिला पत्रकारांना अटक झाल्यानंतर रेड्डी यांनी हे विधान केले.
रेड्डी विधानसभेत म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री आहे म्हणून मी गप्प आहे असे समजू नका. मी तुम्हाला नग्न करून मारहाण करेन. मी माझ्या पदामुळे सहनशीलता बाळगत आहे. आता मी जे काही करेन ते कायद्याच्या कक्षेत राहून करेन, असेही रेड्डी म्हणाले.
रेड्डी म्हणाले... -
पत्रकारितेच्या नावाखाली सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर पसरवण्याची संस्कृती फोफावत बसण्याची मी वाट पाहत बसणार नाही.
माझ्या कुटुंबातील महिलांविरुद्ध सोशल मीडिया पोस्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेमुळे माझे रक्त उसळत आहे. यूट्यूब चॅनल सुरू करून कोणीही पत्रकार मानला जाऊ शकत नाही. सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना सोडणार नाही.
रेवंत रेड्डी यांनी जनसंपर्क मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांना मान्यताप्राप्त पत्रकारांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, ‘ज्यांचे नाव यादीत नाही ते पत्रकार नाहीत तर गुन्हेगार आहेत.’ गुन्हेगारांना जी वागणूक दिली जाते तशीच वागणूक त्यांना दिली जाईल.