काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी; लग्न केलं पण सात जन्माचं नातं 3 महिन्यात संपलं, काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 13:31 IST2022-08-22T13:30:09+5:302022-08-22T13:31:09+5:30

लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यानंतर मुलीचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तरुणीने एक व्हिडीओ शूट केला होता, तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

muzaffarpur shocking suspicious girl death after 3 months of marriage bihar | काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी; लग्न केलं पण सात जन्माचं नातं 3 महिन्यात संपलं, काय घडलं? 

काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी; लग्न केलं पण सात जन्माचं नातं 3 महिन्यात संपलं, काय घडलं? 

प्रेमाचे अनेक किस्से हे सातत्याने समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. काका-पुतणी एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन महिन्यांपूर्वी दोघांनी घऱातून पळून जात लग्न केलं. मात्र यानंतर आता भयंकर प्रकार घडला आहे. लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यानंतर मुलीचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तरुणीने एक व्हिडीओ शूट केला होता, तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तिने माहेरच्यांवर गंभीर आरोप लावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील कोकिलवारा गावात ही घटना घडली आहे. येथे 22 वर्षीय पूजा कुमारी आणि दीपक दास यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. या दोघांनी घरात कोणालाही न सांगता पळून जात लग्न केलं. लग्नाच्या तीन महिन्यांनतर पूजा कुमारीची तब्येत अचानक बिघडली आणि उपचारादरम्यान शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.

मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच वडील तातडीने लेकीच्या घरी पोहोचले. तेथे पोहोचल्यावर पाहिलं तर सासरची मंडळी मुलीवर अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत होते. मात्र पूजाच्या वडिलांनी तब्बल 3 तासांपर्यंत मृतदेह थांबवून ठेवला. सोबतच पोलिसांनाही बोलावलं. यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, मुलीला जबरदस्ती पळवून नेण्यात आलं आणि नंतर तिची हत्या केली.

पूजाने केलेला व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 3 महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यात ती म्हणते की, मी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे. माझ्यावर कोणीही जबरदस्ती केली नाही. मी दीपकवर 8 वर्षांपासून प्रेम करते. मात्र माझे आई-वडील आणि भाऊ याच्या विरोधात आहेत. या घटनेने परिसराक एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: muzaffarpur shocking suspicious girl death after 3 months of marriage bihar