उत्तर प्रदेशातीलप्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावरगेल्या बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी अनेक भाविकांनी अमृत स्नान केले. मात्र, याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूरमधून एक वेगळेच समोर आले आहे. येथील एका व्यक्तीने मौनी अमावस्येला अमृत स्नान करता आले नाही म्हणून रेल्वे प्रशासनाकडे ५० लाख रुपयांची भरपाई मागितली आहे.
राजन झा नावाच्या व्यक्तीने मुझफ्फरपूरहून प्रयागराजला जाण्यासाठी स्वतंत्रता सेनानी ट्रेनच्या थर्ड एसी कोचची स्वतःसाठी आणि कुटुंबातील इतर दोन सदस्यांसाठी तिकिटे बुक केली होती, परंतु रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे त्यांना कोचपर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे राजन झा यांनी रेल्वेकडे तक्रार केली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
राजन झा हे आपल्या कुटुंबीयांसमवेत २७ जानेवारीला मौनी अमावस्येनिमित्त स्नान करण्यासाठी मुझफ्फरपूरहून प्रयागराजला जाण्यासाठी स्वतंत्रता सेनानी ट्रेनच्या थर्ड एसीमध्ये तात्काळ तिकीट बुक केले होते. त्यांना एसी कोचच्या B3 मधील सीट क्रमांक ४५, ४६ आणि ४७ वर आल्या कुटुंबीयांसोबत प्रवास करायचा होता.
ट्रेन रात्री ९.३० वाजता निघणार होती, पण राजन झा हे आपल्या कुटुंबीयांसह अडीच तास आधी, म्हणजे संध्याकाळी ७ वाजता स्टेशनवर पोहोचले होते. राजन झा यांनी सांगितले की, ज्या ट्रेनमध्ये माझी सीट होती, त्या कोचचा दरवाजा आतून बंद होता. महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी स्टेशन खचाखच भरले होते. स्टेशनवर गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे आम्ही कोचपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यामुळे त्यांची ट्रेन चुकली.
५० लाख रुपयांची भरपाईदरम्यान, याप्रकरणी राजन झा यांनी आपले वकील एसके झा यांच्यामार्फत रेल्वेकडून ५० लाख रुपयांची भरपाई मागितली आहे. या प्रकरणाची माहिती देताना वकील एसके झा म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सेवेतील कमतरता असल्याचे हे प्रकरण आहे, ज्यामध्ये रेल्वेचा निष्काळजीपणा दिसून येतो. राजन झा यांना कुटुंबासह अमृत स्नानासाठी जायचे होते, परंतु कोचचा दरवाजा उघडत नसल्यामुळे ते त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकले नाहीत.