शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

हैदराबादमधील एकदम फिल्मी स्टोरी, 'मटण सूप'ने केला हत्येचा उलगडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 1:48 PM

एका मटण सूपमुळे मिळालेल्या टिपच्या आधारे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची उकल केली आहे. हैदराबादमधील ही घटना आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असं हे प्रकरण आहे.

ठळक मुद्देएका मटण सूपमुळे मिळालेल्या टिपच्या आधारे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची उकल केली आहेएम स्वाती हिने आपला प्रियकर राजेशसोबत मिळून आधी आपला पती एम सुधाकर रेड्डी याची हत्या केलीयानंतर आपल्या पतीची ओळख लपवण्यासाठी प्रियकराच्या चेह-यावर अॅसिड फेकलं होतं

हैदराबाद - एका मटण सूपमुळे मिळालेल्या टिपच्या आधारे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची उकल केली आहे. हैदराबादमधील ही घटना आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असं हे प्रकरण आहे. अॅसिड हल्ल्याचा तपास करणा-या पोलिसांना मटण सूपमुळे हे एक हत्या प्रकरण असून खूप मोठा कट रचला गेल्याचं लक्षात आलं. सत्य समोर आलं तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. 

काय आहे नेमकं प्रकरण मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये राहणा-या एम स्वाती हिने आपला प्रियकर राजेशसोबत मिळून आधी आपला पती एम सुधाकर रेड्डी याची हत्या केली. यानंतर आपल्या पतीची ओळख लपवण्यासाठी प्रियकराच्या चेह-यावर अॅसिड फेकलं. नंतर चालाखीने सर्वांना आपला पती सुधाकर रेड्डीवर अॅसिड हल्ला झाल्याचं सांगितलं. कुटुंबातील लोकांनीही स्वातीवर विश्वास ठेवत स्वातीचा प्रियकर राजेशला सुधाकर रेड्डी समजून रुग्णालयात दाखल केलं. 

मटण सूपमुळे आला संशयराजेश रुग्णालयात दाखल असताना कुटुंबातील एका सदस्याने त्याला मटण सूप ऑफर केलं. पण राजेश शाकाहारी असल्या कारणाने त्याने सूप पिण्यास नकार दिला. यामुळेच सुधाकर रेड्डीच्या कुटुंबियांना संशय आला, कारण सुधार रेड्डीला मटण सूप प्रचंड आवडत होतं. नेमकं इथेच गणित फसलं आणि कुटंबियांचा संशय वाढला. त्यांनी पोलिसांकडे फिंगरप्रिंट टेस्ट करण्याची मागणी केली. टेस्ट केल्यानंतर त्यांचं पितळं उघड पडलं आणि पोलिसांना हत्येचा उलगडा झाला. 

आधी बेशुद्दीचं इंजेक्शन आणि नंतर हत्याटेस्टनंतर पोलिसांना नेमका प्रकार लक्षात आला आणि त्यांनी स्वातीला अटक केली. चौकशीदरम्यान स्वातीने आपण आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली, आणि नंतर प्रियकर राजेशलाच सुधाकर म्हणून सगळ्यांसमोर आणण्यासाठी त्याच्या चेह-यावर अॅसिड फेकल्याची कबुली दिली.

स्वातीने सांगितलं की, 'सुधाकर रेड्डी झोपला असताना प्रियकरासोबत मिळून आधी त्याला बेशुद्दीचं इंजेक्शन दिलं, आणि नंतर लोखंडी रॉडने वार करुन हत्या केली'. प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस सलग स्वातीची चौकशी करत आहेत. तिचा प्रियकर राजेश रुग्णालयात दाखल असल्या कारणाने अद्याप त्याला अटक करण्यात आलेलं नाही.  

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिस