ईस्टर्नसाठी मस्ट -

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:38+5:302014-12-18T00:40:38+5:30

Must for Easter - | ईस्टर्नसाठी मस्ट -

ईस्टर्नसाठी मस्ट -

यकोर्टाचा ठपका : न्यायालयीन मित्राने उघडला खोटेपणा
नागपूर : रस्ते विकासाकरिता कापलेल्या झाडांच्या मोबदल्यात करावयाच्या वृक्षारोपणासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची भूमिका अप्रामाणिक आहे, असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ठेवला.
वृक्षारोपणासंदर्भात प्राधिकरण गंभीर नसल्याची बाब गेल्या काही महिन्यांतील अनुभवावरून न्यायालयाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे न्यायालयाने प्राधिकरणच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायालयाच्या निर्देशावरून महामार्ग प्राधिकरणने नागपूर-बैतूल महामार्गावरील ५२ हजार ५८१ झाडे जगल्याची माहिती दिली होती. ही बाब खरी आहे की खोटी, हे पाहण्यासाठी न्यायालयाने न्यायालयीन मित्र ॲड. एस. एस. सान्याल यांना निरीक्षणासाठी पाठविले होते. ॲड. सान्याल यांनी झाडांची पाहणी करून अहवाल सादर केला. नागपूर-बैतूलपर्यंतच्या ५६ किलोमीटर महामार्गावरील ४० टक्के झाडे आजारी व वाईट अवस्थेत असल्याची माहिती त्यांनी अहवालात देऊन महामार्ग प्राधिकरणचा खोटेपणा पुढे आणला. यावरून न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्राधिकरणला कडक शब्दांत फटकारून ॲड. सान्याल यांच्या अहवालावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. महामार्गावरील वृक्षांचे संरक्षण व वृक्ष लागवडीसाठी नेचर कन्झर्व्हेशन असोसिएशनने जनहित याचिका दाखल केली आहे.

Web Title: Must for Easter -