शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मागे हटावेच लागेल, चीनला सुनावले; ड्रॅगनची अट भारताला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:06 IST

चीनने भारताला फिंगर १ वरून मागे हटण्याचा प्रस्ताव देत स्वहद्दीत मागे हटण्याची तयारी दर्शवली. भारताने हा प्रस्ताव अमान्य केला.

नवी दिल्ली : ईशान्य लद्दाख सीमेवर चीनच्या कागाळ्या सुरूच आहेत. स्वहद्दीत मागे हटण्याची तयारी दाखवताना चीनने ठेवलेल्या अटी भारताने धुडकावून लावल्या. वारंवार सकारात्मक चर्चेच्या बातम्या प्रसारित करणा?्या चीनचा प्रत्यक्ष हेतू वेगळाच आहे. आम्ही मागे हटू पण भारतानेही फिंगर ४ पासून स्वहद्दीत मागे जावे अशी अट चीनने ठेवताच भारताने त्यास नकार दिला. चिनी सैनिक फिंगर चारमध्ये स्वहद्दीत गस्त घालत नव्हते, आता तेथे सैनिकांची संख्या वाढली असल्याचे भारताला मान्य नाही. उलट फिंगर चारमध्ये भारतीय सैनिक गेल्या सहा दशकांपासून तैनात असल्याने मागे हटणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले. गेल्या तीन महिन्यांपासून चीनी ड्रॅगनची भारताने वेगवेगळ्या स्तरावर कोंडी केली आहे. चीनने स्वहद्दीत माघार घेतल्याशिवाय संबंध पूर्ववत होणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले,

हा प्रस्ताव धुडकावला-चीनने भारताला फिंगर १ वरून मागे हटण्याचा प्रस्ताव देत स्वहद्दीत मागे हटण्याची तयारी दर्शवली. भारताने हा प्रस्ताव अमान्य केला. स्वहद्दीत मागे हटणार नाही, तुम्हीच १९९३ च्या करारानुसार मागे हटा, बांधकाम हटवा असे भारताने चीनला खडसावले. लष्करी, राजनैतिक स्तरावरील चर्चेदरम्यान चीन रोजच रंग बदलत असल्याने भारताने युद्धसज्जता केली आहे.फिंगर ४ व ८ जवळ चीनने मोठ्या प्मार्णावर स्वहद्दीत बांधकाम केले. रस्ता बांधला. तात्पुरती चौकी उभारली. भारताने त्यास आक्षेप घेतला. कराराप्रमाणे चीन स्वहद्दीत पुढे येवू शकत नाही.नेपाळचा भूभाग चीनने बळकावलानेपाळच्या सीमावर्ती सात जिल्ह्यांतील काही भूभाग चीनने बळकावला आहे, असे नेपाळच्या कृषी मंत्रालयाच्या सर्वेक्षण विभागाने एका अहवालात म्हटले आहे. तसेच आणखी भूभाग घशात घालण्याचे चीनचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असेही या खात्याने नेपाळ सरकारला कळविले आहे. हा अहवाल दडपण्याचे प्रयत्न नेपाळ कम्युनिस्ट पक्षाकडून होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या विस्तारवादी धोरणाकडे नेपाळ कम्युनिस्ट पक्षाकडून कानाडोळा करण्यात येत आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन