हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या मुस्लिम तरुणाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 12:39 PM2021-12-08T12:39:36+5:302021-12-08T12:39:43+5:30

'माझ्या परिसरातील मुस्लिम लोक मला खूप त्रास देतात, मी आता जिहादी म्हणून जगू शकत नाही.'

A Muslim youth who expressed his desire to convert to Hinduism was beaten in Kanpur | हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या मुस्लिम तरुणाला मारहाण

हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या मुस्लिम तरुणाला मारहाण

Next

कानपूर: मुस्लिम तरुणाने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कर्नलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अली नावाच्या तरुणावर मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, कानपूरमधील कर्नलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अस्लम नावाचा तरुण राहतो. त्याला इस्लाम सोडून हिंदू धर्मात प्रवेश करायचा होता. त्याने हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे परिसरातील अली नावाच्या तरुणाने त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर त्याने गळ्यात भगवा रुमाल टाकून पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना घडलेली घटना सांगितली. 

'मला जेहादी बनायचे नाही...'
पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या अस्लमने सांगितले की, परिसरातील लोक त्याला खूप त्रास देतात. आता तो जिहादी म्हणून जगू शकत नाही. परिसरातील लोक त्याला मुस्लिम धर्मातच राहण्यास सांगत आहेत, पण त्याला आता हिंदू व्हायचे आहे. अस्लमने सांगितले की, मोहम्मद अली नावाचा एक तरुणाने त्याला बेदम मारहाण केली आणि अनेकदा त्रास दिला. त्याला हिंदू बनून आपला व्यवसाय चालवायचा आहे. एकतर तो हिंदू होईल किंवा तो परिसर सोडून इतरत्र जाईल. मात्र, पोलिसांनी या तरुणाला मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले आहे.

माजी अध्यक्षांनी हिंदू धर्म स्वीकारला
विशेष म्हणजे, यापूर्वी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनीही इस्लामचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला आहे. वसीम रिझवीने गाझियाबादमधील डासना मंदिरात कायद्याने हिंदू धर्म स्वीकारला. वसीम रिझवीचे नाव आता जितेंद्र नारायण सिंह त्यागी आहे. 


 

Web Title: A Muslim youth who expressed his desire to convert to Hinduism was beaten in Kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.