शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

भगवद्गीता वाचणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण; तरुणांनी हिसकावली धार्मिक पुस्तकं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 7:41 AM

तरुणांविरोधात गुन्हा दाखल; पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

आग्रा: भगवद्गीता वाचणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण झाल्याची अलिगढमध्ये घटना घडली आहे. मुस्लिम समाजाच्याच तरुणांनी ही मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित व्यक्ती स्वत:च्या घरी भगवद्गीता वाचत असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे 55 वर्षीय दिलशेर काल (गुरुवारी) सकाळी 9 वाजता घरी परतले. त्यानंतर त्यांनी भगवद्गीता वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी समीर, झाकीर आणि काही तरुण दिलशेर यांच्या घरात घुसले. त्यांनी दिलशेर यांना मारहाण केली आणि त्यांच्या घरातील गीता, रामायण आणि हिंदू धर्माशी संबंधित ग्रंथ घेऊन निघून गेले. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं हे वृत्त दिलं आहे. गेल्या 38 वर्षांपासून धार्मिक पुस्तकं वाचत असल्याचं दिलशेर यांनी सांगितलं. 'मी मुस्लिम आहे. पण माझा धर्म मला इतर धर्माचे पवित्र ग्रंथ वाचण्यापासून रोखत नाही,' असंदेखील ते म्हणाले. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अलिगढचे पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी दिली. आरोपी समीर, झाकीर आणि अन्य अज्ञात तरुणांविरोधात कलम 298 (धार्मिक भावनांना धक्का पोहोचवणे), कलम 323 (मारहाण), कलम 452 (चुकीच्या उद्देषानं घरात घुसखोरी), कलम 504 (शांतता भंग करण्याचा प्रयत्न) आणि कलम 506 (गुन्हेगारी कृत्य) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Muslimमुस्लीम